पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. (९१ ) लोक काय खटपट करितात याविषयी कर्नल फेर यांनी बातमी ठेविली असती आणि त्याची लबाडी पकडली असती तर त्यांस मोठे यश मिळाले असतें इतकेंच नाहीं, पण. दरबारचे शेसिडेंट या नात्याने त्यांचें तें कर्तव्य देखील होते; परंतु मल्हारराव महाराज यांचें दुर्दैव इतकें उग्र होते की ज्या रेसिडेंटांनी त्यांची अब्रू सांभाळली तेच त्यांची अ ब्रू घेण्यासाठी जे लोक पुढे येत त्यांस पूर्ण आश्रय देत असत. 9 अहमदनगर येथील ख्रिस्तधर्मानुयायी लोकांनी या कामांत साक्षी दिल्या आ हते त्याजवर न्यायाच्या कोर्टाने विशेष भरंवसा ठेवावा असे जें होप साहेब यांचें ह्मणणें आहे तें त्यांस योग्य आहे. प्रत्येक मनुष्यास आपला धर्मकाय तो पवित्र आणि त्या धर्मातील लोक विशेष नितीमान् असे वाटणे स्वाभाविक आहे; परंतु ज्याच्या तर्फे त्या लोकांनी साक्षी दिल्या तो पांडू इतका दुष्ट आणि त्याची फिर्याद इतकी खोठी होती की त्यांचे तर्फे साक्षी देऊन त्या स्त्रिस्तधमीनुयायी लोकांनी आपणांस वामन गणेश, पुकट्या आणि रामकृष्ण मल्हार यांचे पंक्तीस बसवून घेतलें. गवरनर जनरल आणि मुंबई सरकार यांनी लक्ष्मीबाई साहेब यांस झालेला मुलगा महाराजांचें औरस संतान आहे हे ठरविण्यांत जें न्यायाचें वर्तन केले त्याविषयों आपण यथार्थ वर्णन देखील करूं शकणार नाही. मल्हारराव महाराज यांच्या दुर्दैवाचा. पराजय करून त्यांस सुखी करावे यासाठी लार्ड नार्थब्रुक यानीं पराकाष्ठेचा प्रयत्न. केला, परंतु सरतेशेवटी त्यांचें देखील बळ खुंटलें आणि मल्हारराव महाराज यांचा शेवट अगदीं वाईट झाला; तथापि देखील या संबंधानें महाराज दोन्ही सरकारचे आभारी आहेत असे आह्मी समजतो.