पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वांचून पांडूचें बोलणे खरें मानण्यासारखा तो मनुष्य नाहीं. पांडूच्या तर्फे असा कोणता निर्दोष पुरावा होप साहेब यांजपुढे दाखल झाला होता की त्याच्या फिर्या- दीस त्यांनीं इतकें खरेंपणाचे रूप द्यावें? त्यांहून उलट अशी प्रमाणें तर पुष्कळ आ- हेत की त्यानें या कामांत सर्व पुरावा खोटाच आणिला होता. पांडूच्या दोन वकीलांनों गायकवाडांनीं त्यांस आपलेसे करून घेतल्यामुळे आपले अंग काढून घेतलें यास प्रमाण काय तें कर्नल फेरे यांस बातमी लागली तें. ही बा- तमी त्यांस कोणीं कळविली व ती त्यांनीं खरी कोणत्या प्रमाणावरून मानिली याज- विषयीं प्रमाण पाहूं गेले असता त्याचा कांहींच पत्ता लागावयाचा नाहीं. कर्नल फेर यांची अंतःकरणप्रवृति हेच त्याचे प्रमाण. गायकवाडावर हा प्रसंग मोठा बिकट होता. त्यांनी पांडूच्या फिर्यादीचें निराकरण होण्यापूर्वी लक्ष्मीबाई आपली बायको करून ठेवली होती आणि त्यांचे द्वेष्टे पाहि- जे तो यत्न करून त्या पांडूची बायको होती असे ठरविण्यासाठी खोटा पुरावा उभा करितील असे त्यांस भय वाटत होतें, व त्यांच्या दरबारांतील रेसिडेंट सर्व प्रकारे त्यांस प्रतिकूळ होते. पांडूची फिर्याद खरी झाली असती आणि लक्ष्मीबाई, त्यांची आई गंगाबाई, आणि बाप रखमाजीराव यांचे इंग्रज सरकारांनी मागणें केले असते तर मल्हारराव महाराज यांस काय वाटले असतें बरें? व त्यांची काय स्थिति झाली असती? ज्या स्त्रीला आपणापासून गर्भ राहिला आहे, व जिला आपण आपली रागी कली आहे, तिला इंग्रज सरकारच्या स्वाधीन करणें ही गोष्ट त्यांच्या जिवावर येऊन ठेपणारी होती; यास्तव त्यांनी पांडूचा खोटा पुरावा लागू पडूं नये ह्मणून लाखो रुपये खर्च केले असतील व पराकाष्ठेचे श्रम घेतले असतील तर त्यांत त्यांनी काय गैरवाजवी केल व त्यावर होप साहेब यांनी टीका करावी असे त्यांत काय आहे? गायकवाडांचे एजंट इकडून तिकडे आणि तिकडून इकडे बातमी कळण्या- साठी जात येत असतील; परंतु कर्नल फेर साहेब यांस आपले हेर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पाठवून पांडूच्या फिर्यादीच्या संबंधानें गायकवाड काय ख- टपट करितात याची बातमी ठेवण्याचें व अतिशय परिश्रम करण्याचें काय बरें प्र योजन होते? मुंबई सरकार आणि रेसिडेंट यांजमध्ये झालेल्या पत्रव्यवहारांत असे कोठें आढळत नाहीं, की पांडूच्या फिर्यादीबद्दल गायकवाड कांहीं खटपट करितील तर त्याबद्दल रोसडेंट साहेब यांनी बातमी ठेवावी असा त्यांस सरकारानी हुकूम केला होता. तसे रोसडेंट साहेब यांनी सरकारास देखील असें कोठें कळविल्याचे आढळत नाही की आपण याजबद्दल बारीक बातमी ठेवीत आहोत. कर्नल फेर साहेब बडोद्याच्या दरबारचे रोसेडेंट या नात्याने त्यांस या कामांत येवढी उठाठेव करण्याचें कांहीं देखील प्रयोजन नव्हतें; कारण यांत कांहीं राजकीय प्रकरणाचा संबंध नव्हता. गा- यकवाडांचे लग्नाबद्दल अक्षत घेतली असता आपण त्यांत विभागी होऊं असें कर्नल फेर यांस वाटले; परंतु पांडूच्या फिर्यादीमध्ये विभागी होण्यास त्यांस कांहीं शंका • वाटली नाहीं. महाराजांची अब्रू घेण्याकरितां पांडू आणि आंांचे साथी दुसरे दुष्ट