पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. ( ८९ ) मसलती होत असत त्या देखील कर्नल फेर यांस कळत होत्या व दादाभाई त्यांसं शिव्या देत होते हेंही त्यांस कळत होते मग ही गोष्ट त्यांस कशी बरें कळली नाहीं ? पांडूच्या फिर्यादीविषयों होप साहेब यांनी सरकारास अभिप्राय दिला त्यांतील कांही गोष्टी लक्षांत घेण्यासारख्या आहेत. अहमदनगरच्या माजिस्त्रेठापुढें पांडूचा पुरावा अगदी खोटा पडला इतकेंच नाहीं, पण पांडू कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे देखील माजिस्त्रेट साहेब यांनी प्रास द्धीस आणिलें; तथापि देखील होप साहेब यांनी पांडूच्या फिर्यादीस खरपेणाचें बरेंच स्वरूप दिले होते. ते ह्मणतात कीं:- १ पांडूच्या वकीलाने त्यास लागलीच सोडून दिले यावरून साक्षीदारांच्या नांवां- ची यादी त्या वकीलानें गायकवाडांच्या स्वाधीन केली असेल हें संभवनीय आहे. २ कर्नल फेर साहेब यांस जी माहिती मिळाली तीवरून त्याच्या वकीलास गा- यकवाडांनी आपलेसे करून घेतले याविषयीं कांहीं संशय रहात नाहीं. ३ अहमदनगर जिल्ह्यांत गायकवाडांनीं पुष्कळ पैसा खर्च केला आणि परि श्रम घेतले. ४ पांडू यास दुसरी बायको असणें कांही असंभवनीय नाहीं; परंतु गायकवाडांच्या वजनापुढे व पैशाच्या बळापुढे पांडूस आपली फिर्याद खरी करण्यास अ तिशय संकट पडलें असेल. ५ कर्नल फेर यांस गायकवाडांचे एजंट इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात येत असत याजबद्दल नित्य नियमानें बातमी मिळत असे आणि नगर जिल्ह्यां- तील लोक बडोद्यास जातांना व तेथून येतांना एकापेक्षा अधिक वेळां सुरत येथें ओळखण्यांत आले होते. पांडूची फिर्याद खरी असावी याविषयीं होप साहेब यांनी सदहू कारणें योजिली असून त्यांखेरीज त्यांनी आणखी एक सबळ कारण असे दाखविले आहे की, ख्रिस्तधर्मानुयायी लोकांनी पांडूच्या तर्फे साक्षी दिल्या आहेत आणि न्यायाच्या कोर्टाने त्या साक्षींवर विशेष भरवसा ठेविला पाहिजे. होप साहेब ह्मणतात तितक्याही गोष्टी गायकवाडांकडून घडल्या असे मानि तरी पांडूचा खरा पुरावा त्या योगानें लटका पडला गेला असे अनुमान करण्यास कांहीं देखील प्रमाण नाही. त्यावरून इतकेंच मानितां येईल की पांडूचा खोटा पुरावा न लागू पडूं देण्यासाठी गायकवाडीकडून प्रयत्न करण्यांत आला होता; आणि तसे गायकत्रा- डांनी कां करूं नये याचें कारण आपणांस समजत नाहीं व त्यांत गायकवाडांचा दोष तरी काय? पांडूचे कांहीं साक्षीदार गायकवाडांनी पैसा देऊन फितविले होते असें आ- पण घटकाभर कबूल करूं; परंतु अहमदनगरच्या माजिस्त्रेटानों आपण होऊन बोलाविले ते देखील गायकवाडांनी लांच देऊन फितविले होते काय ? अहमदनगरचे माजिब्रेट साहेब ह्मणतात कीं, अगदी निर्दोष पुरावा असल्या- ९