पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या मंडळीचा उत्कर्ष. (१५) महाराजांची पहिली गोविंदजी नाईक याजवर महाराजांचा पराकाष्ठेचा विश्वास होता. स्त्री भागू बाई यांच्या माहेरचा हा मनुष्य. राजाच्या साक्षात्संबंधी ज्या कांही वस्तु व द्रव्य त्याची व्यवस्था राजाचा जो अति विश्वासु खिसमतगार अगर हुजऱ्या असेल त्याजकडे असावी अशी चाल परंपरेने चालत आलेली होती त्याप्रमाणे खासगी जामदारखान्याचे काम गोविंदजी नाईक याजकडे सांगितले होतें, आणि महाराजानी लग्न केल्यानंतर श्रीमंत म्हाळसावाई साहेब यांच्या तैनातीस पूर्ण विश्वासाचा मनुष्य म्हणून त्यांची योजना केली होती. नानाजी विठ्ठल यांजकडे जवाहिरखान्याचे काम सोपले होते त्या खेरीज त्यांजकडे बिलवरखाना वगैरे कामे असत. विष्णुपंत नेने आणि मुकुंदराव मामा यांजकडे कांहीं कामे सोपविलीं नवतीं; कारण खंडेराव महाराज याणी त्या लोकांस कैदेत टाकिले होते त्यांतून त्यांस मुक्त केल्याबद्दल रोसिडेंट साहेब काय म्हणतील याबद्दलची मल्हारराव महाराजांस शंका होती, यामुळे त्यांस कांहीं अधिकार मिळाला नाहीं, परंतु त्यांजवर महाराज यांची पूर्ण कृपा होती. दामोदरपंत नेने यांस नारायणराव केळकर निवर्तल्यावर खाजगीचे दिवाण नेमिलें. हा अधिकार विष्णुपंत यांजला द्यावयाचा, परंतु त्यांस वर लिहिलेली हरकत होती म्हणून तो अधिकार दामोदरपंत यांस मिळाला. महाराज यांची कंन्या कमासाहेब शिरके हे तर महाराज यांचे काय तें एकुलतें एक अपत्य होतें. त्यांस पाहिजे ती वस्तु त्याणी घ्यावी अशी सदर परवानगी होती, परंतु पुढे कांहीं दिवसांनी महाराजांस असे कळून आले की, त्यांच्या तृष्णेस कांहीं मर्यादाच ' नाहीं तेव्हां त्याणीं त्यांस प्रतिबंध केला, परंतु त्यांस नेमणूक फार मोठी करून दिली. लोकांची कामें दरबारांतून उलगडून देऊन त्या पुष्कळ पैसा मिळवीत असत. हरीबा दादा गायकवाड यांस त्या वेळी बराच अर्यलाभ झाला असे म्हणत होते. त्यानीं आपल्या मंडळीस मोठमोठ्या नेमणुका करून देववून त्यांस महाराज यांचे मंडळींत दाखल केलें. बळवंतराव राहुरकर यांजवर इतकें प्रेम असूनही त्यांजकडे कांही महिनेपर्यंत विधिपूर्वक राजकीय कामासंबंधी कांहीं अधिकार दिला नव्हता; तथापि त्यांची सत्ता अमर्याद होती. मल्हारराव महाराज अगदी त्यांचे अधीन असत, त्यामुळे राजसूत्र चालक काय तो तोच होता. 1 याप्रमाणे आपल्या मेहेरबानींतील मंडळीस मल्हारराव महाराज याणी मोठमोठे बहुमान आणि मोठमोठ्या नेमणुका करून दिल्या असतांही आपण त्यांचे अऋणी झालो असे मल्हारराव महाराज यांस वाटलेच नाहीं. कोणी कांहीं इच्छा केली ह्मणजे महाराज ती तत्काळ पूर्ण करीत असत. पालख्या, चोपदार, छत्र्या, मशाली हे बहुमान देण्यांत इतका अविवेक झाला होता की, इतर शिष्ट लोकांस ते बहुमान धारण करणे लज्जास्पद वाटू लागले होते. मल्हारराव महाराज याणी गायकवाडाच्या संपत्तीचा अविनयानें असा खर्च केला त्याचें