पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(cc ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ठ्या धांदलीनें दरबारांत येणे आणि उभ्या उभ्या दिवाणास लखोटा देऊन व निरो- प सांगून सांप्रदायाप्रमाणें आदरातिथ्य न स्वीकारितां तसेच चालते होणें सर्व प्रकारें करून महाराजांच्या अपमानास कारण होतें. जेव्हां बोवी साहेब भरधाव शहरांतू- न राजवाड्यांत आले तेव्हां लोकांस तर काय पण दरबारी मंडळीस देखील असा संदेह आला कीं, लग्नास प्रतिबंध करण्यास ते आले की काय, आणि महाराज देव- प्रतिष्ठा बसवीत होते ती त्यांनी थांबवून बाहेर विचारावयास पाठविलें कीं, तो विधि चालू करावा किंवा बंद ठेवावा. याप्रमाणे त्यासमयीं दरबारामध्यें धांदल झाली होती. याप्रमाणे जगजाहीर रीतीनें महाराजांचा अपमान झाला होता; मग तो बुद्धी- पुरस्सर केला असो अगर नसो. पण इतकें तर खचित आहे की, आपल्या या धांदली- च्या कृत्यापासून लोकांत महाराजांचा उपहास होईल याविषयीं कर्नल फेर यांनीं परवा बाळगली नव्हती. दिवाणाबरोबर रेसिडेंट यांच्या बगल्यांत जाण्याकरितां तयार होऊन अर्ध्या रस्त्यावर गेलेल्या पागा, हत्ती वगैरे परत सरंजाम बोलावून घेणे भाग पड ले यांत महाराजांचा अपमान झाला नाहीं अर्से कोण ह्मणेल? कर्नल फेर साहेब तर ही गोष्ट अगदींच नाकबूल करितात. ते झणतात की, बोवी साहेब दरबारांत गेले ते- व्हां वरातीची कांहीं देखील तयारी नव्हती असें बोवी साहेब यांनी मला सांगितलें. आपल्या लोकांस वेळेची किंमत नाही हे खरे आहे परंतु राजाच्या दरबारांत रोस- डेटाबरोबरील व्यवहारांत वेळ किती बरोबर साधण्यांत येते हें सर्वांस ठाऊक आहे आणि याच करितां रावसाहेब बापुभाई यांनी रेसिडेंट साहेब यांजकडे दोन वेळां जाऊन साडे अकरा वाजतां दिवाणांनी रोसडेंट यांच बंगल्यांत जावें असे नक्की क रून ठेविले होतें. नवसरीचे राजवाड्यापासून रोसेडेंट राहत होते तो बंगला दो- न मैलाहून ज्यास्ती लांब आहे. रेसिडेंट साहेबच कबूल करतात की मी यादीचें उत्तर तयार केले तेव्हां अकरा वाजण्यास आले होते. अर्थात त्यानंतर त्यांनी बोवीसाहेब यांस दरबारांत पाठविलें. बोवोसाहेब यांनी दरबारामध्यें अक्षतीचे समारंभाची तयारी पाहिली नसेल हें संभवनीय आहे, कारण नक्की नेमलेली वेळ साधण्यासाठी मंदगतीने चालणारें समारंभाचें सर्व उपकरण पूर्वीच रवाना केले होते आणि त्यास रेसिडेंट साहेब यांच्या बंगल्याच्या आलीकडे काही अंतरावर उभे राहण्याचा हुकूम दिला होता आणि मागाहून घोड्याच्या गाडींत दिवाण आदीकरून मंडळी त्या ठिकाणीं जाऊन तेथून थाटमाटानें रेसिडेंट साहेब यांचे बंगल्यास वाजत गाजत जाण्याचा संकेत होता. तेव्हां दरबारांत समारंभाची तयारी बोवी साहेब यांस कोठून दृष्टीस पडेल? परंतु तेवढ्यावरून अगदीच तयारी करण्यांत आली नव्हती हैं कसें संभवेल ? बोवी साहेब दरबारांत आले तेव्हां साडेअकरा वाजण्यास थोडा अवकाश होता, इ- तके अल्प अवकाशांत सर्व तयारी करून रेसिडेंट साहेब यांच बंगल्यांत नेमल्या वेळे. सकसें जातां आलें असतें? निकडीने जातांना व येतांना मार्गामध्यें बोवी साहेब यां. स समारंभाचे साहित्य दिसलें नसेल परंतु कर्नल फेर साहेब यांच्या हेराकडून देखील ही बातमी त्यांस कशी समजली नाहीं हैं मोठे नवल वाटतें. दरबारांत ज्या कांहीं गुप्त