पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह.. (८७) च्या रोजनिशींत असा मजकूर आहे कीं दादाभाई आम्हांस शिव्या देतो व आमच्या- वर तोहमत ठेवितो असे साहेब बोलले. दादाभाईचें सभ्य वर्तन, त्याचा शिष्टपणा व त्याची योग्यता ज्यास अनुभूत आहे त्यास सहजच असे वाटेल कों हें केवळ दुष्ट. बातमी देणाराचें नीच कर्म आहे. अशा प्रकारच्या चाहाडखोराच्या सांगण्यावर कर्नल फेर यांनीं विश्वास ठेवून त्याजविषयीं दरबारच्या कामगारांजवळ उद्द्वार काढणें हें ते बडोद्याचे रेसिडेंट या नात्याने त्यांस किती अनुचित होते हैं सांगतां देखील येत नाहीं. 'कहनेवाला दिवाना पण सुनताभी दिवाना' ही ह्मण कर्नल फेर यांस दरबारच्या कामगारांनी ह्मणून दाखविली ती बरोबर येथे लागू पडते. बातमी देणाराच्या आणि ऐकणाराच्या योग्यतेमध्ये अशा प्रसंगी किंचित् देखील भेद दिसत नाहीं. नेटिव राजाच्या दरबारांत यथाश्रुतग्राही रोसडेंट असला तर भाऊ पुणेकरा- सारखे कारस्थानी लोक राजावर व दरबारी लोकांवर काय काय संकटें आणितील. याची कल्पना देखील करवत नाहीं. महाराजांचा मुद्दाम अपमान करावा या हेतूनें कर्नल फेर यांनी अक्षत स्वीकारण्या- स नाहीं झटले व बोवीसाहेब यांस दरबारांत पाठवून त्यांजकडून सर्वांदेखत आपला निरोप दिवाणास सांगविला असे निश्चयपूर्वक म्हणणे विचारयुक्त होईल असे वाटत नाही. कारण अविवेकी मनुष्याच्या मनांत नसतां ही त्याच्या कृत्याचा असा स्वाभाविक परिणाम होतो की दुसऱ्यास त्यानें तें बुद्धीपूर्वक केलें असें वाटावें; आणि त्याप्रमाणे रेसिडेंट यांच्या कृत्याचा परिणाम झाला असेल. परंतु रेसिडेंट यांनी जसे मुद्दाम अपमान करण्यासाठी तसें केलें नाहीं तसेंच महाराजांनी आपला अप- मान केला असे मानले यांत त्यांनी देखील रेसिडेंट साहेब यांजवर उगीच दोष आ- गिला होता असें नाहीं. व रेसिडेंट यांनी लोकांसमक्ष राजाबरोबर कशी वागणूक करावी याजविषय राजधर्मवित्त पुरुषांनी जे नियन त्यांस घालून दिल होते त्यांचा क र्नल फेर यांनी अतिक्रम केल्यामुळे राजकीय संबंधानें फार वाईट परीणाम होत मेले यांत संशय नाहीं. मल्हारराव महाराजांच्या संबंधाने लोकांच्या मनावर अगोदर- पासून निराळाच ठसा उठला होता. सर रिचर्ड मीडच्या कमिशनच्या योगाने महा- राजाचें महत्व कमी झाले होते व त्यांचे सरदार आणि प्रजा त्यांच्या आज्ञा योग्य रीतीने मानीनातशा झाल्या होत्या. अशा प्रसंगी त्यांच्या दरबारांत बोवी साहेब यांस पाठ. वून त्यांजकडून नगजाहीर महाराजांना प्रतिकूळ असा निरोप सांगविणे अगदीं उचित नव्हतें. कर्नल फेर लणतात कीं, मीं बोवी साहेब यांस पाठविले त्यांत महाराजांस एक प्रकारचा मान दिला होता, आणि दिवाणाकडून ही त्यांनी तसे वदवून घेतलें. आ ह्मी कबूल करतों की, इतर प्रसंगी बोवी साहेब यांचें संदेशहरत्व खरोखर महाराजांच्या अतिशय सन्मानास कारण झाले असतें, परंतु तो संदेश महाराजांच्या हिताचा अस ला पाहिजे होता. हा प्रसंग अगदर्दी निराळा होता. महाराजांस लग्नोत्साहसमयीं अतिशय वाईट वाटेल असा तो निरोप होता व त्या प्रसंगी बोवी साहेब यांचे मो.