पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. तांना वरील शब्दयोजना योग्य झाली असती किंवा दुसरे शब्द योजिले पा- हिजे होते हैं इंग्रजी भाषेचें ज्यांस पूर्ण ज्ञान त्यांस माहीत. परंतु कर्नल फेर यांनी या शब्दाचा अर्थ रावसाहेब बापुभाई यांस करून दाखवि ला तो जर खरा अर्थ असेल तर तसा भाव दाखविण्याची महाराजांची व त्यांच्या दरबारांतील जुन्या कामगारांची इच्छा नव्हती आणि तसे कृत्य कर्नल फेर यांनी केलेंही नव्हतें, हे अगदी खरे आहे आणि त्याजबद्दलचा सर्व दोष दादाभाईकडे- सच राहतो. रावसाहेब बापुभाई दयाशंकर यांनी रोजनिशी लिहिली आहे त्यावरून असे दिसतें की ता० ११ मे रोजी बापुभाई आणि गोविंदराव मामा कर्नल फेर साहेब यां- च्या भेटीस गेले होते. तेव्हां साहेबांनी त्यांस विचारिलें की खलित्यांत एक शब्द लिहि. ला आहे त्याचा अर्थ तुलीं करून पाहिला आहे ? कामगारांनी उत्तर दिले 'नाहीं' साहेब ह्मणाले की जाहीर रस्त्यांत उभे राहून शिवी दिली असतां किंवा मार- ण्याकरितां आंगावर घांवून मातीचें ढेंकूळ फेकिलें असतां तशा प्रसंगीं जे शब्द लागूं पडतात ते खळियांत उपयोगांत आणिले आहेत. नंतर रावबाहादूर मणीभाई ज्यसभाई यांजकडून गुजराथीमध्ये त्या शब्दांचा अर्थ सांगविला तेव्हां उभयतां कामगार यांनी उत्तर दिले की, इंग्रजी शब्दांची आह्मांस माहिती नाहीं; जे लिहिले असेल तें खरें.' रेसिडेंट साहेब यांनी त्या शब्दांचा उपयोग कोठें करितात याविषयों सांगितलें तें जर खरे असले तर या खलियांत त्या शब्दांचा उपयोग गैर रीतीने झाला हें स्प- ट आहे. कारण की भर रस्त्यांत उभे राहून शिवी देणे अथवा मारण्याकरितां अंगा- चर जाऊन मातीचें ढेंकूळ फेकणे अशा जातीचें कृय कर्नल फेर यांजकडून व त्यांचे असिष्टंट बोवी साहेब यांजकडून मुळींच झाले नव्हतें. पण अक्षत देण्याविषयीं दिवाणांनी अमुक वाजतां यावे असे सांगितल्यानंतर व या संबंधाने दरबारांत सर्व तयारी झाल्यावर बोवी साहेब यांस भरधाव घोड्यानिशीं यादी देऊन दरबारांत पाठ. विणे आणि त्यांनी लग्न समारंभामध्ये एकत्र जमलेल्या हजारों लोकांसमक्ष दिवाणास " लग्नाचे आमंत्रणास तुह्मी आला असतां रेसिडेंट साहेब तुमची भेट घेणार नाहीत' असे सांगणे या कृत्यास जर ते शब्द योजतां येतील तर कर्नल फेर यांनी त्याचा भलताच अर्थ करून कामगार यांस भय घालण्याचे काय बरें प्रयोजन होतें ? खलियांतील लेखाच्या अर्थाविषयों दरबारच्या लोकांजवळ वाटाघाट करीत बस ण्याची कर्नल फेर यांस कांहीं गरज नव्हती. आपले हकीकतीबरोबर तो खलिता सरकाराकडेस पाठवून द्यावा इतकेच काय तें त्यांचे काम होतें, तो लिहिला कोणीं, त्याचा अर्थ तुझी काय समजला याबद्दल दरबारचे लोकांस प्रश्न करणें व दरबारांत त्यावद्दल काय विचार चालले आहेत याविषयी हेर ठेवून चौकशी करणे आणि त्यांनी जें कांही सांगितलें तें खरें मानून त्याप्रमाणेच घडले आहे अशी सरकारची खात्री करणे कर्नल फेर यांचे कृत्य अगदीं निर्दोष होतें काय ? ता० २० मेच्या बापुभाई-