पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. (८५) नसती आणि खलिता आज रवाना करावयाचा किंवा उद्यां याविषयी त्यांनी काळ. जीपूर्वक मला विचारिलें. मी उत्तर दिले की खलिता आज पाठविण्यात येईल, कारण अशा प्रकारचा दस्तऐवज सरकाराकडे लागलाच गेला पाहिजे. दिवाणाने दादाभाईचा हेवा करून असा अभिप्राय दिला असो किंवा यथायोग्य दिला असो, परंतु ज्याचा दरबाराशी संबंध नाही अशा बातमी देणाराकडून मला असे कळले आहे की दरबारामध्ये खलिता परत घेण्याविषयी खरोखर घाटत होतें आणि त्या बातमीच्या खरेपणाविषयों मला कांहीं संशय वाटत नाहीं. मी पूर्वी दादाभाईविषयीं असा अभिप्राय दिला आहे की तो राजकीय कामांत अनर्थकारक घोटाळा उ- त्पन्न करणारा मनुष्य आहे. त्यास या उद्धट लेखावरून प्रमाण मिळते व या घडून आलेल्या गोष्टीवरून राज्यकारभारांत सुधारणूक करण्याविषयों दादाभाई अगदीं नालायख आहेत असे ठरतें. महाराज संकटांत आहेत असे त्यांस वाटविल्याने त्यांच्या मनांत घातकर क्रोध उत्पन्न होऊन सरकारच्या मनांत त्यांस कांहीं उपदेश कराव- याचें आलें तर तो मात्र ते अगदींच ऐकेनासे होत चालले आहेत. नानासाहेब दिवाण यांस रेसिडेंट साहेब यांनी काय विचारिलें, खलित्याचा अर्थ गुजराथी भाषेत काय सांगितला, आणि त्यांनी रोसेडेंट यांस काय उत्तर दिलें हैं त्या दोघांसच माहित. आपल्यास येथें इतकाच विचार कर्तव्य आहे, की रेसिडेंट साहेब यांनी खलित्यांतील अर्थाविषयीं दिवाणाबरोबर येवटी वाटाघाट केली त्याचें प्रयोजन काय आणि तसे करणें रेसिडेंटास उचित होते की काय ? बाटाघाटीचे प्रयोजन दुसरे कांहीं दिसत नाहीं. दरबारचे लोकांस भय घालून महा- राजांनी तो खालेता परत घ्यावा येवढाच काय तो हेतु दिसतो; कारण अक्षतीसाठी दिवाणानें यावें असा रुकार देऊन नंतर त्यांस त्यांनी मनाई केली होती आणि तसें कर- ण्यांत जो उपाय योजिला होता तो अगदर्दी असभ्यपणाचा होता आणि त्यामुळे महा- राजांस उघड रीतीने आपला उपमर्द केला आणि लोकांसमक्ष आपला अपमान केला असे वाटण्यासारखे झाले होतें. रोसेंडेंटास सरकारांनी असा हुकूम देऊन ठे- विला होता की त्यांनी कोणतीही गोष्ट निकरावर येईल असे कांहीं करूं नये, असे असतां त्यांजकडून या हुकुमाचा आव्हेर झाला होता तेव्हां हें प्रकरण सरकारा पर्यंत गेले असतां कोणत्या थरास जाईल याविषयी त्यांस काळजी वाटावी हें स्वाभाविक होतें. त्या खलियांतील दोन शब्दांवर कायतो कर्नल फेर यांचा कटाक्ष होता ते शब्द हे:- ‘Outrage and Public insult.' या शब्दाचा अर्थ आह्मी तर असा समजतों कीं, उघड उपमर्द आणि जगजा_ होर अपमान. मराठी खलिता लिहिला असता, किंवा मराठीमध्ये मसुदा केला अस ता तर आह्नीं वरील शब्दाचा उपयोग केला असता. मग इंग्रजीमध्यें भाषांतर कर,