पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( c४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आणिल्याने मी, तुझी गादीवर आला तेव्हांपासूनच्या तुमच्या स्वतःच्या आचर- णाकडेस व तुमच्या राज्यव्यवस्थेकडेस कानाडोळा करीन असे समजूं नका. मा. झ्यावर आळ आणणे शहाणपणाचे आहे असे लोकांनी तुह्मांस शिकविलें असेल. परंतु ध्यानात ठेवा, खरोखर घडून आलेल्या गोष्टीपुढे ते अगदी निष्फळ आहे. मी गुप्त रीतीनें कांहीं केले नाहीं. जे काही केले ते उघड आणि स्पष्ट दिवसाच्या प्रकाशाप्रमाणे आहे. तुम्हांस माहीत आहे कीं, मी प्रतिपादनपूर्वक विनवणीनें लोकांस न्याय देण्याकडेस तुमचें मन वळविण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व निष्फ- ळ झाला. यासाठी सांप्रतची स्थिति तुमच्या स्वतःच्या स्वेच्छाचारी वर्तनाने व वाईट मसळत देणारांच्या तुझी अगदीं आधीन झाल्यामुळे झाली आहे असे तुझी समजा. ज्या खलित्यांत कर्नल फेर यांची महाराजांनी स्तुति केली त्याच्या आठ दिवस अगोदर ता० १८ आक्टोबर सन १८७३ रोजी कर्नल फेर यांनी महाराजांस या- दी लिहिली त्यांतील वरचा मजकूर आहे त्यावरून ता० २५ आक्टोबर सन १८७३ च्या खलित्यांत कर्नल फेर यांची महाराजांनी स्तुति केली होती त्यास ते किती पात्र होते हैं अगदी स्पष्टच होते. असभ्य आणि कठोर शब्दप्रयोग करून अपमान क रण्याची रोसडेंटची चाल आहे अशी महाराज फिर्याद करितात आणि त्याबद्दल- चा खुलासा सांगतांना कर्नल फेर महाराजांचें ह्मणणें खरें होईल अशा प्रकारचें एक वाक्य रिपोर्टात लिहितात आणि त्यांस कळत नाहीं की महाराज जो आरोप आपल्यावर आणतात तो आपल्या लेखावरूनच आपल्यावर लागू होत आहे !! आतां मुंबईसरकारांनी महाराजांची फिर्याद लक्षपूर्वक ऐकली नाही ही गोष्ट स्वतंत्र आहे, परंतु महाराजांचें ह्मणणे कर्नल फेर यांच्या रिपोटांवरूनच खरे ठरतें.

तारीख ९ मे सन १८७४ च्या रिपोटांतील ताजाकलमांत कर्नल फेर लिहितात की नानासाहेब दिवाण आज प्रातःकाळीं मला भेटले तेव्हां त्यांस हा खलिता कोणी लिहिला ह्मणून स्पष्ट विचारिलें. त्यांनी सांगितले की दादाभाईनी लि- हिला. तेव्हां मीं त्यांस विचारिलें कीं यांतील मजकूर तुझांस माहीत आहे ? त्यांनी मोघम उतर दिले कीं होय. तथापि खलियाच्या अर्थाविषयीं त्यांस पूर्ण बोध झाल्याचा मला संशय आल्यावरून मी त्याचा अर्थ गुजराथीमध्यें तोंडानें सांगविला. माझ्या राज्यकारभाराविषयों शेसिडेंटाने उघड द्वेष केल्यामुळे मी पुष्कळ सोसले वगैरे वाक्यें त्यांनी ऐकिली तेव्हां तशा अर्थाचे माहितीविषयीं त्यांनी नाकारले आणि त्याविषयीं असा खुलासा सांगितला की दरबारचे द्वेष्टे यांच्या हकीकती ऐकून त्याप्रमाणे रेसिडेंटांनी वर्तन केले असा भाव दाखवि ण्याचा इरादा होता, पण रोसेंडेंट स्वतः द्वेष करितात असे लिहिण्याचा बिलकुल इरादा नव्हता. त्यांनी आणखी ह्या खलित्याची एकंदर भाषा अगदीं नापसंत केली. ते झणाले दरबारच्या दुसऱ्या कामगारांपासून अशा प्रकारची रचना कर्धीही झाली

  • ब्ल्यू बुक नंबर २ पान पहा.