पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह.. (८३) वावयाची होती. क्षुलक, असभ्य, आणि कठोर शब्दप्रयोगाबद्दल आजपर्यंत मी आपल्या जाहिरातीस आणिलें नाहीं; परंतु त्याचा जेव्हां कळस झाला तेव्हा आपल्या- स अपील केले आहे," असे महाराजांनी खलित्यांत लिहिले आहे.

त्याविषयीं कर्नल फेर यांनी ता० २५ आक्टोबर सन १८७३च्या खलियांत त्यांची महाराजांनी प्रशंसा केली होती तें प्रमाण दाखवून त्या लेखाशीं हलीं त्या खलित्यांतील लेखाचा विरोध दाखविला आणि महाराजांशी आपण असभ्यपणाची वर्तणूक कधीं ही केली नाही असे प्रतिपादन केले. त्यांनी दोन्ही लेखांमध्ये वि- रोध दाखविला तो खरा आहे. ता० २५ आक्टोबरच्या खलित्यांत त्यांची महारा- जांनी पराकाष्ठेची स्तुति केली असून त्यास आपले परम मित्र आणि हितेच्छु म्ह- टलें होते आणि ता० ९ मेच्या खलित्यांत त्याहून अगदी उलट मजकूर लिहिला हो- ता, तेव्हां या दोहोंपैकीं खरी गोष्ट कोणती याचा निवाडा झाला पाहिजे. तारीख २५ आक्टोबर सन १८७४ चा खलिता गवरनर जनरल यांनी प.. हिलें कमिशन नेमिलें त्या प्रसंगीचा आहे. कमिशन पाठविण्याची काही गरज नाहीं, कर्नल फेर साहेब यांच्या सहायाने राज्यामध्ये सुधारणूक करण्यात येईल असे लिहून त्यांची त्यांत स्तुति केली होती. संकटकाळ प्राप्त झाला असता असे कोणी ही क रील. एक अगदी प्राकृत ह्मण अशी आहे कीं, ' बखत पडे बांका तो गधेकुं कहे- ना काका. ' मल्हारराव महाराज यांजवर तो प्रसंग तसाच बिकट होता. कमि- शनाचें संकट कोणीकडून तरी मिटवावें हें त्यांच्या मनांत होतें. कर्नल फेर यांचे दोष काढल्यानें व त्यांस आपले शत्रु ह्मटल्यानें कार्यभाग उरकणार नव्हता, या साठीं त्यांनीं त्यांची स्तुति केली होती, परंतु तें केवळ शब्दपांडित्य होतें, आणि Praise undeserved is satire in disguise. " या ह्मणीप्रमाणें ती केवळ स्तुतिरूप निंदा होती. कर्नल फेर यांनी आपल्या स.. गळ्या कारकीर्दीत महाराजांनी त्यांस आपले परम मित्र आणि परम हितेच्छु म्हणावें असें एक कृत्य देखील केलें नाहीं; पण त्यांहून उलट शेंकडों कृत्ये दाखवितां ये- तील आणि तीं या ग्रंथांत ठिकठिकाणी निदर्शनास आणिली ही आहेत. कर्नल फेर यांनी ज्या रिपोर्टात आपल्या स्तुतीचे प्रमाण दाखवून महाराजांच्या खलित्यांतले लिहिण्यांत विरोध दारखावला आहे त्याच्या शेवटी त्यानीं एका यादींत महाराजांस आपण काय लिहिलें त्याचा उतारा दिला आहे, त्यावरूनच ते महाराजा- शीं किती असभ्यपणाने वागत होते तें समजून येतें. तें समग्र वाक्य आह्मीं टिपेंत लिहिले आहे . त्याचा अर्थ असा कीं, माझ्यावर अशा प्रकारचे उफराटे आळ .“ Do not think you can divert attention from your own administration and your own personal acts since you came to the throne by & counter-attack on me.. Persons may have taught you that such is a clever move to make, but believe me that it is an utterly futile one before the array of facts that can be brought forward. I have done nothing secretly, all has been as clear and open as daylight. I have, as Your Highness knows, endeavoured, by argument as well as by entreaty, to move you to do common justice to pour yeople, but without avail, and therefore you must at- tribute the present state of affairs to your own self-will and to the evil influence of bad adrisers." ( Blue Book Page 19.)