पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. क्याच कारणाने त्यांचा त्यांनीं इतका द्वेष केला कीं सरतेशेवटी आपण राजाच्या दरबारांत रेसिडेंटच्या हुद्यास नालायक आहोत असा आपल्या कपाळी सुद्धा डाग लावून घेतला. त्यांच्या रिपोर्टातील कांहीं वाक्यें तर हसू येण्याजोगी आहेत. तारीख ८ मे सन १८७४ नंबर १२९४८२ च्या रिपोटीत ते लिहितात कीं, सरकारांनी या लग्ना- मध्ये तिन्हाईतपणे राहण्याचा जो निश्चय केला तो महाराजांस इतका अप्रिय वा- टला की, त्यांनी त्यांतून पार पडण्यासाठी शक्य होते तितके उपाय केले आणि सरतेशेवटीं फसवणुकीचा आणि प्रचाराबाहरेचा उपाय योजिला. त्यांस असे वाटले कीं, उतावळीमध्ये आपला बेत सिद्धीस जाईल; परंतु त्यांत ही ते निराश झाले आणि सरकारांनी आपला तिन्हाईतपणे राहण्याचा संकल्प समग्रतेनें शेवटास नेला. ता० ९ मे सन १८७४ च्या रिपोर्टातील तिसरे कलमांत याच अर्थाचं त्यांचे दुसरे ह्मण- णें आहे, त्यांत सरकारचे राजनीतीचा पराजय करण्याकरितां महाराजांनी ठगाईची युक्ति योजिली; परंतु त्यांचे डावपेंच न चालूं देण्यासाठी मी उलट उपाय योजिले असे लिहिले आहे. कर्नल फेर यांस सांप्रदायाप्रमाणे अक्षत देणे यांत काय कारस्थान व डावपेंच होते आणि त्यांनी दिवाणास अक्षत देण्यासाठीं येऊं दिलें नाहीं, यांत तो त्यांनी काय उलट उपाय योजिला? या लग्नास सरकारचें अनुमत असावे असें महाराजांच्या मनांत असते व रेसिडेंट साहेब यांनीं अक्षत घेतली ह्मणजे अनुमति मिळाल्याप्रमाणे होईल असे त्यांस वाटले असते तर त्यांनीं लष्करी मान नको ह्मणून कां सांगितलें असतें ? लष्करी मानापेक्षां रेसिडेंटाच्या हातावर लग्नाच्या आमं त्रणाबद्दल तांदुळ टाकणे यांत जास्त महत्व ते काय होते ? आमच्या विचाराप्रमाणे तर लग्नसमयीं रेसिडेंट साहेब यांच्या विद्यमानतेपेक्षां देखील लष्करी मानाचें मह- त्व फार मोठे आहे; कारण तेणेंकरून सर्व ब्रिटिश राष्ट्राच्या अधिपतीची विद्यमा- नता बोधित होते. त्याची देखील ज्या राजानें परवा केला नाहीं, त्यानें रेसिडेंट यांस अक्षत देणे यांत कांहीं विशेष महत्व मानले असेल असे संभवतच नाहीं; फक्त रेरोसि- डेंट थांस एक प्रकारचा मान द्यावा, मग ते लग्नास येवोत अगर न येवोत हाच महाराजांच्या मनांतील खरा हेतु असतां त्याजवर ते ठगाई करून फसवीत होते असा रेसिडेंट यांनी आरोप आणिला हा त्यांचा केवढा अविचार आणि किती गैर समजून !! कर्नल फेर यांनी महाराजांस अपमान वाटेल असे कृत्य केल्यामुळे महाराजांच्या मनास ती गोष्ट फारच लागली. हा वेळपर्यंत त्यांनी जे जे झाले ते सर्व नम्रतेनें • सोसलें; परंतु आतां त्यांच्यानें कर्नल फेर यांचे अपकार सोसवेनात. त्यांनीं खलि. त्यांत त्यांजपासून जे पूर्वी अपकार झाले ते बाहेर काढिले. “माझ्या प्रतिष्ठेस · आणि अधिकारास रोसडेंट साहेब यांच्या उघड द्वेषभावानें फार हानि झाली, परंतु भीं ती हा वेळपर्यंत सोसली आणि त्यावर फिर्याद केली नाहीं, परंतु आतां मला मौन • धरवत नाहीं. लोकांदेखत मजशी कसे वागावे याविषयी त्यांनी फार काळजी ठे..