पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. (८१ ) यांनी कर्नल फेर यांस दिवाण अक्षत घेऊन येणार आहेत असे स्पष्ट सांगितलें हो- ते व तें चांगले समजून घेऊन त्यांनी त्याबद्दल रुकार दिला होता, याविषयी काहीं भ्रांति नाहीं; परंतु अक्षत देण्याकरितां नवरीमुलीचा बाप देखील येणार आहे, ही गोष्ट बापुभाई यांनी त्यांस कळविली नव्हती; आणि ती मात्र यादीचें भाषांतर पाहिल्यावर समजली, हें खरें आहे. नवरीमुलीच्या बापाची भेट घेऊन त्यास आपल्या कचेरीत मान देणें रेसिडेंट यांस आवडलें नाहीं; आणि केवळ येव- ढ्यासाठी त्यांनी हा येवढा मोठा व्यूह रचून महाराजांस अपमान वाटावा असे केलें, असे आह्मांस खात्रीपूर्वक वाटतें, आणि त्यास प्रमाणे आहेत. त्याच दिवशीं बापुभाई अक्षत स्वीकारण्याविषयी कर्नल फेर साहेब यांचे मन वळविण्यास पुन्हां गेले, ते- व्हां साहेब त्यांस ह्मणाले कीं, आह्मी तुमचें सांगणें असे समजलों नव्हतों कीं दिवाण- साहेब यांजबरोबर लक्ष्मीबाईचा बाप देखील येईल आणि तो ही अक्षत देईल. हा खुलासा तुझीं दिलेल्या यादीचा तरजुमा इंग्रजीत केल्यावर समजला, त्यामुळे महाराजांस आह्मीं छोटेसाहेब यांजबरोबर अक्षतीस येऊ नये म्हणून सांगून पाठविले आहे. कर्नल फेर यांनीं ता० ८ मे सन १८७४ चे रिपोर्टात सरकारास असे कळविलें होतें कीं लक्ष्मीबाईस मी माझे बंगल्यांत येऊ द्यावे यासाठी माझे मन वळविण्याचा महाराजांनीं कांहीं महिन्यापूर्वी प्रयत्न केला; परंतु मी त्यांस सांगितलें कीं माझी बायको त्यांचा सत्कार करू शकत नाहीं. ही महाराजांची विनंति बेअदबीची होती, परंतु त्यांच्या वर्तनाकडे लक्ष देऊन मी उगीच राहिलों. लक्ष्मीबाई साहेब यांस आपल्या मडमेस भेटण्यास येऊं द्या असें ह्मणणे ज्यास अपमान वाटला त्यास ल क्ष्मीबाई साहेब यांचा बाप रखमाजीराव यास आपल्या कचेरींत येऊं देणे, त्याचा सत्कार करणे, आणि त्याच्या हातचे अक्षतेचे तांदुळ आपले हातावर पडूं देणें कसे आवडे- ल! कर्नल फेर यांनी वारंवार रखमाजीराव यास सावत्र बाप असे विशेषण दिले आहे, आणि त्यास आपल्या बंगल्यांत येऊं द्यावयाचें नाहीं येवढ्यासाठी महाराजांस अप- मान वाटेल असे कृत्य त्यांनी केले. त्यांस आपल्या मनांतील हेतु स्पष्टपणें सरकारास सांगू शकवला नाहीं, सबब त्यांनी अक्षत घेतली असतां लग्नास अनुमति दिली असे होईल असे निमित्त दाखवून आपण जे केले ते वाजवी केलें असे सरकारचे मनांत उतरून दिले; परंतु अंतर्गत हेतु काय तो वर लिहिल्याप्रमाणे होता. कर्नल फेर यांचा स्वभाव जितका उतावळा होता तसाच अविचारी ही होता. जें कांहीं मनांत आलें तें तडकाफडकी लागलींच करून टाकावयाचें; मग त्यांत सूक्तासूक्त काय आहे याचा विचार करावयाचा नाही. त्याचप्रमाणे एकाद्यावर दोषा- रोप करावयाचा असला ह्मणजे त्यांत ही मार्गे पुढे पाहण्याचें नाहीं. जे मनास वाटेल तें ह्मणायाचें, मग त्यास कांहीं प्रमाण असो अगर नसो. महाराजांच्या खलित्याबरोबर कर्नल फेर साहेब यांनीं जो रिपोर्ट केला आहे, त्याजवरून दोषारोप करण्यामध्ये त्यांचा अविचारीपणा आणि वक्र स्वभाव यांचे चांगले प्रकटीकरण होते. तो खलिता दादाभाई नवरोजी यांनी लिहिला इत