पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. साहेब यांचे पत्र देऊन ह्मणाले कीं तुह्मी अक्षत देण्यासाठी याल तर रेसिडेंट तुम- ची भेट घेणार नाहींत. ही महाराजांची उघड अमर्यादा झाली नाहीं असे कोणासही वाटणार नाहीं. बोवीसाहेब यास बसावयास खुर्ची देत असतां देखील त्यांनी घेतली नाहीं. रोसिडेंट साहेब यांचे पत्र दिवाणास एकांत देऊन त्यांचा निरोप सांगितला असता तर त्यांत काय नासलें असतें ? बाबासाहेब ह्मणतात की, शक्य होते तितकें करून मी रेसिडेंट साहेब यांचा निरोप दिवाणास सभ्यरीतीने सांगितला. हे त्यांचें कृय त्यांस जर स भ्य वाटले आहे तर त्यांत सभ्यपणा ह्मणजे काय याची ओळखच नाही असे झटले पाहिजे. वास्तविक ह्मटले ह्मणजे बोवीसाहेब यांजवरोबर तोंडी निरोप पाठविण्याचीच कांही गरज नव्हती. जें कांहीं महाराजांस कळवावयाचे होते तें पत्रात लिहिलेच हो- ते; मग तोच अक्षरें हजारों लोकांसमक्ष बोवीसाहेब यांजकडून पढविण्याचें तरी काय कारण होतें ? जी गोष्ट निष्प्रयाजन होती ती जेणेकरून लोकांत उपहास व्हावा अशा रीतीने करण्यांत आली यांत आपला अपमान झाला असे महाराजांनी मानूं नये तर काय मानावें? बोवीसाहेब यांनी आपण दरवारांत जाऊन काय केले त्याजबद्दल रेसि डेंटसाहेब यांस रिपोर्ट केला आहे, त्यांत ते असे लिहितात की मीं दिवाणास महारा- जांचे नांवचा कागद देऊन असे सांगितले की ह्या लग्नामध्ये कोणत्याही सांप्रदायिक शिष्टाचाराचा स्वीकार करूं नये अशी सरकारांनी रोसेडेंट साहेब यांस मनाई केली आहे. यासाठी त्यांच्यानें सांप्रदायिक अक्षतीच्या वरातीला आपणाकडेस येऊं देतां येत नाहीं, ह्या लग्नांत कोणत्याही सांप्रदायिक शिष्टाचाराचा देखील अंगीकार करूं नये असा सरकारांनी हुकूम दिला नसतां, कोणत्या आधारानें रोसडेंट साहेब यांनी बोवीसा हेब यांस व त्यांनी दिवाणास तसे सांगित हे त्यांचेच माहीत. कर्नल फेर यानीं अक्षत देण्याकरितां दिवाणास आपणाकडे येऊं देऊन अक्षत घेतल्या- वर सभ्यपणाने दोन गोड शब्द बोलून लग्नास आपल्याच्यानें येववणार नाहीं असे कार- णासह सांगितलें असतें तर त्यांत काय चिघडलें असतं ? व नुसती अक्षत घेतल्याने सर्व गुजरायभर सरकारांनी लग्नास अनुमति दिली असे कशाने झालें असतें ? कदा- चित कर्नल फेर यांच्या ह्मणण्याप्रमाणे आपण घटकाभर कबूल करूं की सर्व लोकांस त्यावेळेस वाटले असते की लग्नाविषयों सरकारांनी अनुमाते दिली, तरी ती लोकांची समजूत किती वेळ टिकणार होती ? दोन किंवा तीन तासाने त्याजबद्दलचें निराकरण झाले असतें. लग्नसमयीं रोसडेंट साहेब गेले नसते ह्मणजे त्यांनी लग्नाचे आमंत्रण स्वी- कारिलें नाहीं असे सर्व गुजराथेत त्यांच्या कार्नी लागणारे लोकांनी टिमकी वाजवून प्रसिद्धीस आणिलें असतें. आमंत्रणास येऊं देणे ह्मणजे आमंत्रण स्वीकारणे होय अशी कर्नल फेर यांची खरोखर समजूत झाली होती आणि त्यावरून त्यांनी अक्षत येऊ दिली नाहीं असे आह्मांस वाटत नाहीं. ज्यास मी लग्नास गेलों असतां पांडूच्या फिर्यादांस कांही व्यत्य य येणार नाहीं असे वाटले होते त्यास लग्नाची अक्षत घेतली असतां लग्नास अनुमति दिली असे कसें वाटेल ? परंतु त्यांच्या कृत्यांतील बीज निराळेच होतें. बापुभाई