पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. कांहीं दोष नाही. त्यांनी महाराजांस देखील अशी सल्ला दिली होती की हे लग्न का ही दिवस तहकुब ठेवावें ह्मणजे तितक्यांत पांडूच्या फिर्यादीचा निकाल होईल आ. णि मग कोणतीच हरकत राहणार नाहीं; पण या हट्टी राजाने ती सल्ला ऐकलो नाहीं परंतु लग्नाच्या आमंत्रणाकरिता अक्षत घेऊन महाराजांच्या दिवाणास कर्नल फेर यांनी येऊं दिले नाहीं, हा यांनी अविचार केला हे त्यांच्याच लेखावरून शाबीद होतें. आपण स्वत: लग्नास गेलो असतां पांडूच्या फिर्यादीस हरकत येणार नाही असे त्यांनी च ह्मटले असून लग्नाचे आमंत्रण देण्याकरितां दिवाणास येऊ दिले नाही. त्याचे का रण ता० ७ मे सन १८७४च्या रिपोटीतील आठव्या कलमांत ते असे लिहितात की या लग्नसंबंधी अक्षतीच्या सांप्रदायिक वरातीला सरकारी नात्याने मजकडे येऊं द्यावें, कचेरीमध्यें दिवाणाचा सत्कार करावा, त्यांचें व नवरीमुलीच्या मानलेल्या बापाचे आ- णि दुसरे दरबारचे कामदार यांचे मी अभिनंदन करावें, आणि अक्षतीचे तांदुळ स्वीकारावे हें मल्ला उचित वाटले नाहीं; कारण येणेकरून सरकारांनी लग्नास अनुमति दिली व अंतःकरणपूर्वक लग्नसमारंभाचे सोहोळे घेतले असे होणार; यासाठी मी अ- क्षतीस अटकाव केला. रेसिडेंटसाहेब यांनी लग्नास जाऊं नये या मनाईचे उत्पादक मुंबईसरकार होते हैं खरें आहे कर्नल फेर यांणा फक्त ह्या लग्नास जे अपवाद होते ते कळविले होते परंतु मुंबई सरकारांनी त्यांस असा कांहीं हुकूम दिला नव्हता की तुल अक्षत देखील घेऊं नये. दोन्ही सरकारांनी लग्नाचे आमं त्रणाबद्दल महाराजांनी पाठविलेले खलिते स्वीकारिले, त्याप्रमाणे सांप्रदायिक अक्षती- चे तांदूळ रेसिडेंट यांणी आपल्या हातावर पडूं दिले असते तर त्यांनी सरकारचा हुकूम मोडला अमा कांही त्यांजकडे दोष आला नसता. कदाचित त्यांस असे वाटले होतें कीं, लग्नाची अक्षत घेतल्याने सरकारच्या हुकुमाची अमान्यता होईल तर त्यांनी रावसाहेब बापुभाई दयाशंकर यांनी दिवाणा- नें अक्षत देण्याकरिता केव्हा यावें असे विचारिलें, त्यावेळेसच त्यांस अक्षत देण्याकरि- तां येऊ नये असे सांगावयाचे होतें. बापुभाई यांनी अक्षतीबद्दल आपणास सुचविलें होते, असे कबूल करण्यास कर्नल फेर यांनी बरीन कांकूं केली आहे. पहिल्याने त्यांनी सरकारास असे कळविले होतें कीं, यादीचे भाषांतर पाहिल्यावर मला समजले की दिवाण अक्षत घेऊन मजकडेस येणार होते, आणि दुसऱ्या रिपोटांत असें क बूल करितात की दुसऱ्या वेळेस बापुभाई परत आले तेव्हां अक्षतीबद्दल मजपाशी बोलले. ह्या त्यांच्या लेखांतील विपर्यासावरून खरी गोष्ट कोणती याविषयी त्यांस बरेंच विस्मरण झाले होते असे दिसतें. चिंता नाही आपण असेंही गृहीत करूं की दुस- ज्यावेळेस मात्र बापुभाई अक्षदीबद्दल बोलले होते, तर त्यावेळेस त्यास थांबवून ठेवून आणि यादीचे भाषांतर पाहून अक्षतीसाठी येऊं नये ह्मणून कां बरें सांगितलें अ नाहीं ? दिवाणानें अमुक वेळेस यावें असे त्यांस निश्चितपणे सांगून मागाहून धावा- धाव करून अक्षतीस अटकाव करण्याचें काय प्रयोजन होतें ? बोवीसाहेब लग्न समारंभास एकत्र झालेल्या हजारों लोकांदेखत दिवाणास रेसिडेंट