पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सरकारचें व राज्याचे अभिष्ट चिंतन निरंतर करीत जावें. सदर्दू धर्मादाय वर्षांसन घेण्यास सरकार वंशांतील अथवा दुसरा जो कोणी हात घालीलत्याजला श्री कुळस्वामीची शपथ आहे.” महाराजांच्या मंडळीपैकी खाली लिहिलेले लोक त्यांस विशेष प्रिय होते. १. शिवाजीराव खानविलकर. १. गोविंदजी नाईक. १. बळवंतराव राहुरकर. १. वसंतराम भाऊ. १. नानाजी विठ्ठल, वर जो बाजीराव सांगितला १. व्यंकटराव मास्तर, महाराजांनी आहे त्याचा बंधु. यास गांव इनाम दिले होते म्हणून त्याचें नांव येथे लिहिले आहे, प रंतु ते त्यास मनापासून चाहत नव्हते. पुढे त्याजवर इतराजी होऊन त्यास त्यांनी बडोद्याच्या हद्दी बाहेर हकून दिले होतें. हा त्यांच्या साक्षरपणाचा परिणाम होय; कारण तो मनुष्य होसीहो म्हणणारा नव्हता, आणि म्हणून- च त्याचें व महाराजांचें गोत्र जमले नाही. १. विष्णुपंत नेने १. मुकुंदराव मामा. १. दामोदरपंत नेने. याचा महाराजांशी पूर्वीचा • कांही संबंध नव्हता. विष्णुपंत नेने याचा बेधु म्हणून महाराजांनी आपल्याजवळ ठेविला आणि तो मग महाराजांस अवडत्या गुणांनी अति प्रिय झाला. याखेरीजही मल्हारराव महाराज यांस आवडते असे पुष्कळ लोक होते. त्यांत तपे आणि टोणपे आडनांवाची मंडळी प्रसिद्ध होती. दोष एका बाजूस ठेवून मल्हारराव महाराज यांस त्यांच्या मित्र मंडळाचा केवळ उदयाचल अशी जर उपमा दिली तर ती त्यांस साजण्यासारखी होती. त्यांनी आपल्या मंडळींचे सर्व मनोरथ मोठ्या आनंदाने परिपूर्ण केले. बळवंतराव राहुरकर यांस मल्हारराव महाराजानी जशी देणगी दिली तशी कोणासच दिली नव्हती. चार लाख रुपये रोख बक्षीस देऊन त्याखेरीज मुलाचे मुंजीसाठी दोन लक्ष रुपये दिले, व सात लक्ष रुपयांचे जवाहीर दिले. ही देणगी महाराज हे बडोद्याचे राजे झाल्यावर • दिली; म्हणजे राणी जमनाबाई यांस कन्या झाल्यानंतर दिली. असे म्हणण्यांत आहे कीं, राणी साहेब प्रसूत होण्यापूर्वी महाराजानी जवाहिरखान्यांतून गुप्त रीतीने कांहीं दागिने बळवंतराव यांस दिले होते. अमळा आणि गोत्री हीं दोन गांवे त्यांस इनाम करून देऊन त्याखेरीज वर्षासने वगैरे नेमणुकी करून दिल्या होत्या. = नानासाहेब खानविलकर यांस इंग्रज सरकारची चाकरी करण्यासाठी गायकवाड सरका- रास तीन हजार स्वार द्यावे लागतात त्याची सुभेगिरी दिली होती व त्याबद्दल त्यांस मोठी नेमणूक करून देऊन बक्षीसही पुष्कळ दिले होतें. वसंतराम भाऊ यांजकडे सरकारी चार दुकानें होती त्यांचे काम सोपले होते व खेरीज सरकारी व खाजगी कापडी जामदारखान्याचाही अधिकार त्यांजकडे होता. असे म्हणतात की, बसंतराम भाऊ यानी महाराजांच्या पूर्वाश्रमांत महाराजांस कांहीं कापड उधार दिले होते त्याबद्दल महाराजांचा हा त्यांजवर प्रत्युपकार होता.