पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कीं, लक्ष्मीबाई आपले लग्नाची बायको आहे, असे एक मनुष्य म्हणत आहे. ह्या बातमी देणाराचें नांव त्यांनी लिहिलें नाहीं. तथापि अनुमान ने तर्क करता येतो कीं भाऊ पुणेकर अथवा तसाच दुसरा कोणी कर्नल फेर यांच्या कृपेंतील मनुष्य असा- वा; त्याखेरीज कर्नल फेर यांजजवळ इतकी नाजूक गोष्ट दुसऱ्याच्याने काढवेल कशी? आतां या कारस्थानामध्ये कर्नल फेर यांचा कांसंबंध होता असे आमचे मुळींच ह्मणणे नाहीं, परंतु ज्या लोकांस कर्नल फेर यांनी आपले बंगल्यांत येऊन आपल्याशी कान गोष्टी करण्य ची परवानगी दिली होती ते लोक येवड्याच साधनाने बाहेर काय काय कारस्थाने करूं शकतील या विषयी कर्नल फेर यांनी दूखर नजर पों- चविली नव्हती. त्यांनी पांडू यास जिल्ह्याच्या माजिस्टापुढे फिर्याद करण्याविषयीं ज्या- मनुष्या बरोबर सांगुन पाठविले त्या मनुष्यानें त्यास काय सांगितले असेल व त्या दुष्ट मनुष्यास असे मोठें धारिष्ट करण्यास किती उत्तेजन दिले असेल याचा देशी राजांच्या दरबारांतील मुत्सदी लोकांस चांगला तर्क बांधितां येईल. श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाईसाहेब यांबरोबर महाराजांचें प्रसिद्धपणे विधियुक्त लग्न होण्यापूर्वी सुमारे पंधरा महिन्यांपासून त्या महाराजांजवळ होत्या व ती गोष्ट कांहीं गुप्त नव्हती. अर्से अतून लग्न होण्यापूर्वी काय तो दोन महिने अगोदर पांडू याने आपली फिर्याद ऐकण्याविषयी कोणाच्या द्वारे रोसेडेंट साहेब यांस विनंति केली होती? पांडूचा आणि लक्ष्मीबाईचा पतिपत्नीपणाचा संबंध असता तर बाईसाहेब महा- राज यांस वश झाल्याचे पांडूत लागलीच कळल्यावांचून कसे राहिले असतें ? होप- साहेब यांजपुढे त्यानेच अशा साक्षी दिल्या होत्या की त्या आपली बायको आहेत असे सुरतेचे लोकांस माहीत होते आणि सुरत येथील हरीभाई चिनिवाल्या- च्या कापसाच्या कारखान्यांत काम करणाज्या मजूर लोकपैिकी लक्ष्मीबाई नांवाची कोणी रूपवती कन्या महाराजांनी स्वीकारली आहे ही जनवार्ता तर महाराजाकडेस या बाई आल्याबरोबर सर्व देशभर पसरली होती ती पांडू यासच कशी कळली नाहीं ? कर्नल फेर यांणी पांडु यास समक्ष बोलावून त्याजबद्दल एक दोन प्र श्न केले असते तर तेवढ्यानेच याच्या ह्मणण्यांत किती खरेपणा होता ते क ळून आलें असतें, अथवा त्याच्या तर्फे विनंति करणारास त्यानें अशा गोष्टी णाकडे आणूं नये असे सांगितले असते ह्मणजे आटपले असतें. आप- ता० २८ एप्रिल सन १८७४च्या रिपोडीत कर्नल फेरसाहेब यांनी सरकारास असे लिहिले होतें कीं, मला जर सरकारांनी मुद्दाम हुकुम दिला नाहीं तर मी लग्ना- स जाईन व शिरस्याप्रमाणे लष्करी मान देईन. लग्नसमयीं माझ्या हजीर राहण्यापा. सून पांडूच्या फिर्यादीस कांहीं हरकत येणार नाही. यावरून लग्नास आपण जाऊं नये अथवा लष्करी मान देऊ नये असे त्यांच्या मनांत पूर्वी कांही एक नव्हते. मुंबई सरकारास असे वाटले की रेसिडेंटसाहेब लग्नास गेले असतां लग्नास अनुमती दिली असें होईल. आणि त्यांनीं गवरनर जनरलचा हुकूम घेऊन कर्नल फेर यांस लग्नास जाऊं नये, फक्त लष्करी मान मात्र द्यावा असा हुकूम दिला यांत कर्नल फेर यांचा