पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. ( ७७ ) झाला होता त्यांपैकी कोणत्याही एका घराण्याशीं, ज्या कुळांत त्या जन्मल्या होत्या असे ह्मणण्यांत आले होते, त्या कुळाचा शरीरसंबंध झाला आहे असा पदर लावल्यावांचून मल्हारराव महाराज यांनी त्या बाईबरोबर लग्न करणे प्रशस्त नव्हते. त्यांत त्या बाईच्या पूर्वस्थितीवरून व महाराजांच्या त्यावेळेच्या स्वतःच्या स्थितीवरून त्यांजबरोबर महारा- जानीं लग्न करावें हे योग्य नव्हते. त्या सुरतेस कापसाच्या एका कारखान्यांत मजुरी क रीत होत्या असे ह्मणण्यांत आले होते व तशा स्थितीत त्या अनन्यपूर्वि- का राहून मल्हारराव यांजकडे आल्या याविषयीं मुंबई सरकारांनी देखील सं शय घेतला होता* व त्या आपली बायको आहे असा एका नीच मनुष्यानें दावा केला होता. आतां तो फिर्याद कितीका लबाडीची असेना, त्या नीच मनुष्यास तसें म्हणतां आलें अशा अगदी हलक्या स्थितीत त्यां होत्या इतके तर त्यांतून निष्पन्न होतेंच. मल्हारराव महाराजांची स्वतांची स्थिति देखील त्यावेळेस तशीच अडचणी- ची होती. सर रिचर्ड मीडच्या कमिशनचा निकाल झाला नव्हता. सरदार लोकांमध्ये व प्रजेमध्ये त्यांचें वजन कमी झाले होते आणि त्यांचे दरबारांतील रोसेडेंट यांच्या प्रातिकूल्यामुळे महाराज यांच्या पवित्र आचरणाला देखील दोष लावण्याचा त्यांच्या शत्रूंनी उपक्रम केला असतां ते विजयी होण्याचा संभव होता; पाप्रमाणे मल्हारराव महाराज यांची स्थिति असतां त्यांनी लक्ष्मीबाईबरोबर अविचारानें लग्न करून आ पणास आपल्या कुळास, व आपल्या राष्ट्रास कलंक लावून घेतला. हा विवाह हिंदु- धर्मशास्त्रसंमत होईल असा बडोद्यांतील शास्त्री मंडळींनीं अभिप्राय दिल्यावरून महाराजांनी लग्न केले आणि इंडिया सरकारच्या अडव्होकेट जनरळाचा अभिप्राय त्याचप्रमाणें पडळा, यामळें बडोद्याचे शास्त्री सर्व प्रकारच्या अपवादापासून मुक्त झाले व धर्नश स्त्रसंबंधाने काही शंका राहिली नाही; परंतु ज्ञाती व कुळ या संबंधानें या लग्नाला जो अपवाद होता त्याची निवृत्ति शेवटपर्यंत झाली नाहीं. या लग्नसबंधाने कर्नल फेर यांच्या वर्तनाविषयीं विचार करिता त्यांत तर पुष्क- ळच दोष आढळतात. पांडू हा किती दुष्ट मनुष्य होता, हें वर सांगितलेंच आहे. लक्ष्मीबाईसाहेब ही आपली लग्नाची दुसरी बायको आहे असे म्हणण्याचे या मनुष्याच्या मनांत कसे आलें व त्याजबद्दल फिर्यादी करण्याचे धैर्य त्यास कशानें आळें याविषयी विचार करितां मल्हारराव महाराजांच्या शत्रूनों कारस्थान रचून त्यास जसा मनुष्य पाहिजे होता तसा त्यांनी मुद्दाम शोधून काढून कर्नल फेर यांच्या हिमायतीवर त्यास खूप मर दिली होती असे म्हणण्यास काही हरकत नाहीं. कर्नल फेर साहेब ह्मणतात कीं, मला दोन महिन्यापूर्वीच बातमी लागली होती The facts established regarding the antecedents of Lakshmibai would show made over to

that while employed as a coolic in Surat she was taken to Baroda and His Highness the Gackwar, but whether this was done at once or after she had passed through other hands is uncertain. (Blue Book No. II Page 24.)