पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. असें मला माहीत नाहीं. न्यायाच्या कोर्टानें ख्रिस्त धर्मानुयायी लोकांच्या साक्षीवर विशेष भरंवसा ठेविला पाहिजे. लक्ष्मीबाई, गंगा आणि रखमाजी यांचें गायकवाडापाशीं मागणे करितां येईल किंवा नाहीं याजाविषयी विचार करितांना मला वाटत नाहीं कीं पांडूनें आणिलेल्या आरोपांबद्दल योग्य पुरावा झाला आहे. तसेच खात्रीपूर्वक असे ही म्हणतां येत नाहीं कीं लक्ष्मीबाई पांडूची बायको नाहीं. ती जर पांडूची बायको नाहीं तर आहे तरी कोण हे समजत नाहीं. याप्रमाणे होप साहेब यांनी अभिप्राय दिला. ता० १६ आक्टोबर सन १८७४ रोजी श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाई साहेब प्रसूत होऊन त्यांस पुत्र झाला. या प्रसंगी ही चालू सांप्रदायाप्रमाणे रेसिडेंट साहेब दरबारास आले नाहींत व लष्करी मान दिला नाहीं. पांडूच्या फिर्यादीचे सर्व कागदपत्र मुंबई सरकारांनी तपासल्यावरून त्यांची खा- ती झाली की पांडूच्या फिर्यादीत काही अर्थ नाही, परंतु लक्ष्मीबाईबरोबर महाराजांनीं खग्न केले हे त्यांस उचित वाटलें नाहीं; कारण त्यांची पूर्वस्थिति चांगली नव्हती. त- थापि ही गोष्ट वेगळी ठेवून लक्ष्मीबाईचा मुलगा कायदेशीर वारस आहे असे मा- नण्यास हरकत नाही. कारण हिंदुधर्मशास्त्राचा त्यास आधार आहे असे त्यांनीं ता० २९ आक्टोबर सन १८७४ नंबर ६२६० चें इंडिया सरकारास पत्र लिहिले (ब्ल्यू बुक नंबर २, पान २४,) आणि त्याबद्दलचा सत्वर हुकूम मागितला. इंडिया सरकारांनी याबद्दल त्यांच्या अडव्होकेट जनरलचा अभिप्राय घेतल्या. वरून त्यांचीही खात्री झाली की हिंदूशास्त्राप्रमाणे लक्ष्मीबाईचा मुलगा महाराजांचा औरस कबूल करण्यास काही हरकत नाही. ता० १२ दिसेंबर सन १८७४ रोजी त्यांनी मुंबई सरकारास असा हुकूम दि ला कीं, सर लुईस पेली यांस गायकवाड सरकारास पुत्र झाला सतां जे मान दे- ण्याचा सांप्रदाय आहे ते मान देण्याविषय हुकूम द्यावा, परंतु महाराजांस असे क ळवावें कीं, यापुढें या मुलाच्या हक्कांविषयीं हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे अथवा ज्ञाती- चालीप्रमाणे कांहीं प्रश्न उप्तन्न होईल तर त्याबद्दल ब्रिटिश सरकारांनी निवाडा केला आहे असे महाराजांनी समजूं नये. ह्यावेळेस कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दल महाराजांवर संशय उत्पन्न झाला होता, सबब सर लुईस पेली यांनी हल्लीं ही गोष्ट तहकूब ठेवावी असा अभिप्राय दिल्यावरून इंडिया सरकारचा हुकूम अमलांत आणण्याचें तहकूब राहिलें तें राहिलेंच. ज्ञाती, कुल, आणि शीळ यांविषयीं योग्य रीतीने चौकशी न करितां आणि सगेसोय- रे यांची संमति न घेतां मल्हारराव महाराज यांनी लक्ष्मीबाई साहेब यांजबरोबर लग्न केले हे त्यांचें कर्म सर्वथैव दूषणार्ह होय. त्यांचा जन्म मराठ्यांच्या जातीमध्ये जीं कुछें विख्यात ह्मणावतात त्यांत झाला होता असा निर्विवाद पुरावा नव्हता; यासाठी त्याजव- द्दल चांगल्या रीतीने चौकशी करून ज्या घराण्यांबरोबर आपल्या कुळाचा शरीरसंबंध