पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. (७५); क्ष देतात आणि त्या पांडूची दुसरी बायको सबब पांडू यास त्यांनी बापतीस्मा देण्या.. चें नाकारिलें. चौथ्या मुद्याबद्दल काहीं निश्चित झाले नाहीं. रजिस्टरावरून असे दिसतें कीं, बा- यकोबद्दल फिर्याद झाली होती पण कागदपत्न नासून टाकिल्यामुळे विशेष हकीकत कळत नाहीं. नवा पुरावा घेतला तो पांडूस अगदर्दी प्रतिकूळ आहे. गां बकरी ह्मणतात ज्या बायकोबद्दल पांडून फिर्याद केली होती ती त्याची बायको नव्हतो आणि ती ३५ पासून ४० वर्षांच्या वयाची होती. ह्या चारी मुद्यांवरील पुराव्याविषयीं सदसद्विचार करून होपसाहेब यांनी सरकारास अभिप्राय दिला तो असा:- - ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की पांडू याने आपली फिर्याद मोठ्या अडचणी- च्या प्रसंगी आणिली आहे. ज्याजपाशीं पांडूने आपली सर्व हकीकत सांगितली त्या वकीलाने त्यास लागलींच सोडून दिले आणि यावरून हे शक्य आहे की साक्षीदारां- च्या नावांचें जें लिष्ट पांडूनें व्याजपाशीं दिलें होतें तें त्यानें गायकवाडांच्या स्वाधीन केले असेल. दुसरे वकील केवळराम आणि जमीयतराम यांनी हा मुकदमा कांहीं वेळपर्यंत फार चांगल्या रीतीने आणि आवेशानें चालविला होता; परंतु नंतर ते मंद पडले आणि सरतेशेवटीं शेवटच्यानें (जो मुख्य काम चालविणारा होता ) अ- शा रीतीने आपढ़ें अंग काढून घेतले की, कर्नल फेर यांस त्या वकीलास गायक- वाडांनी आपलासा करून घेतल्याबद्दल जी बातमी लागली होती तीस बळकटी आली. कर्नल फेर यांस गायकवाडांचे एजंट इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात येत असत, त्याबदल नियमानें बातमी मिळत असे आणि नगर जिल्ह्यां तीळ गांवचे लोक बडोद्यास जातांना व बडोद्यांहून परत येतांना सुरत येथें पुष्कळ वेळां ओळखण्यांत आले होते. पांडूच्या पूर्वाचरणावरून तो विशेष भरंवसा ठेवण्यास पात्र नाहीं. त्यानें स्प्राय.. साहेब यांजपुढे दोन तीन साक्षीदार खोटे आणिले आणि संशय येण्याजोगे आचर- ण केले असें ह्मणण्यांत आले आहे; बातमी देणें हाच त्याचा फार दिवसांचा धंदा आहे आणि गायकवाडांपासून पैसा उपटण्यासाठी त्याने खोटी फिर्याद आणिली असेल असे मानिता येईल. हें आणखी ध्यानांत घेण्यासारखे आहे कीं, अकोले, सोडल्यापासून तो हजीर झाला नाहीं. गायकवाडानें त्याचें मन वळविलें. किंवा कोठें काढून लाविला हें कांही काळाने कळेल. मला बडोद्याहून निनामी पत्र आ आहे कीं, त्याने हजीर होऊं नये अशी व्यवस्था केली आहे. पांहू किती जरी वाईट चालीचा असला तरी त्याला दुसरी बायको असणें हें कांहीं असंभवनीय नाहीं, परंतु द्रव्य आणि गायकवाडाचें वजन यांजपुढे ती गोष्ट शाबाद करणे त्यास फारच कठीण पडले असेल. त्याच्या विरुद्ध पुराव्यामध्ये लवा- डीचीं चिन्हें आहेत. त्याची बायको गामा ह्मणते कीं तो कधीं गुजराथेंत गेला होता