पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दुसया साक्षीदारांप्रमाणेच हकीकत सांगतात, तेव्हां सगळा देश आणि त्यांतील प्रत्येक मनुष्य गायकवाडांच्या एजंटानीं फितविला की काय ? गायकवाडांच्या एजं. टांनीं पुरावा फिरविल्याबद्दल कितीही संशय असो. पांडू आणि त्यांचें एजंट यांनीं ही खोटा पुरावा आणण्यांत कसर ठेविली नाहीं अशी माझी खात्री झाली आहे. वामन गणेश, रामकृष्ण मल्हार आणि तिसरा एक यांच्या जबान्या वाचल्या असतां को णास ही असे वाटेल कीं, ते अशा प्रकारचे साक्षीदार आहेत की कोणतेही ठि. काणीं शपथ वाहून पाहिजे ती साक्ष देण्यास बाजारांत जाऊन विकत घेतां येतील. सुरतेचे माजिस्ट्रेट होप साहेब यांनी सरकारांत रिपोर्ट केला त्यांत पांडूच्या फि- र्यादीची विशेष हकीकत आहे. पांडू यानें आपला दावा खरा करण्याकरितां चार मुद्यांवर पुरावा दिला होता ते मुद्दे:- लक्ष्मीबाई साहेब मुरत येथें त्याजपाशीं होत्या आणि त्या त्याची बायको होत्या असे सर्वांस माहित होतें. रामदास याची बायको गुजाऊ? हिची लक्ष्मीबाई कन्या आणि त्यांजबरोबर अ हमदनगर जिल्ह्यांत त्यांनें लग्न केलें. लग्न झाल्यानंतर लक्ष्मीबाई साहेब यांस अहमदनगरच्या ख्रिस्त धर्मोपदेशकांनी पाहिल्या होत्या आणि त्या पांडूची दुसरी बायको सबब यांनी त्याला बापतीश्मा * दिला नाहीं. पांडू काशीस जात असतां वहऱ्हाड प्रांतांतील अकोळे गांवाजवळील एका खे- ड्याच्या पाटलानें लक्ष्मीबाई साहेब यांचा कबजा घेण्याविषयीं दावा केला होता; परंतु पांडू यानें डेप्युटी कमिशनर यांजजवळ फिर्यादी केल्यावरून लक्ष्मीबाई यांस त्याच्या स्वाधीन केल्या. या चार मुद्यांवर जो पुरावा देण्यांत आला त्याजविषयीं होप साहेब यांचे म्हणणें असे आहे कीं:- सुरत येथील सर्व साक्षीदार पांडूच्या हकीकतीस पुष्टी देतात. ते सांगतात की, लक्ष्मीबाई साहेब तेथे राहत होत्या आणि त्या पांडूची बायको असे आझांस माहीत आहे. दुसऱ्या मुद्यावर अहमदनगरच्या फर्स्ट असिस्टंट माजिस्ट्रेट यांजपुढे पुरावा दिला तो लटका पडला. सर्व साक्षीदार पांडूच्या दुसऱ्या लग्नाविषयीं आपल्यास कांहीं मा- हिती नाहीं असे सांगतात, आणि कांहीं साक्षीदार प्रतिज्ञेवर असे म्हणतात कीं, जी पांडूची खरी बायको तीच रामदास याची बायको गुजाऊ हिची कन्या ज्यांचा आईबापपणा पांडू लक्ष्मीबाईकडेस लावू पाहतो. गामा, तिसऱ्या मुद्यावरचे साक्षीदार पांडूच्या अनुकूलतेचे आहेत. दोन ख्रिस्त धर्मोपदेश - क आणि अहमदनगर येथील मिशनरी स्कूलचा एक पंतोजी लक्ष्मीबाईबद्दल सा.

  • विस्त धर्माची दीक्षा देण्याचा एक संस्कार आहे.