पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. (७३) असे त्यांस वाटले अ.णि त्याबद्दल त्यांनी मुंबई सरकारास ता०९ मे सन १८७१ च्या रिपोटांतील तेराव्या कलमांत लिहिले असून या खरोखर त्यांस कां बरें कांहीं राग आला नाहीं ! त्यांनी कामदारांच्या लक्ष देऊन त्यांस क्षमा केली असेल असे दिसते. बेअदबीबद्दल सत्योक्तीकडेस पांडू बिन गोविंदा खांडवे याच्या फिर्यादीबद्दल सुरतेचे माजिस्त्रेट होप साहेब आणि अहमदनगरचे माजिखेट स्प्राय साहेब यांजपुढे चौकशी झाली, त्यांत त्याचें ह्मणणे लटके पडलें. अहमदनगरचे माजिस्त्रेट यांनीं सरकारांत रिपोर्ट केला, त्यांत पांडू कोणत्या प्रका- रचा मनुष्य आहे याविषयी लिहिले आहे. ते म्हणतात:- मी पांडूस फार दिवसांपासू- न ओळखतों. देशांत मटकत फिरावे आणि पोलिसास गुन्ह्यांबद्दल खन्या खोट्या बातम्या द्याव्या हेच त्याच्या उपजीविकेचे साधन. त्याशिवाय त्याचा दुसरा धंदाच नाहीं. गेल्या पावसाळ्यांत हा मजकडे पुष्कळदा आला आणि जिल्ह्यांतील फंद- फितुराच्या गोष्टी सागूं लागला. मी त्याबद्दल गुप्त चौकशी केली आणि त्यावरून व पांडूच्या भाषणाच्या विपर्यासावरून माझी पक्की खात्री झाली कीं, याच्या सांगाण्याला कांहीं प्रमाण नाहीं. दुसऱ्या निर्दोष पुराव्यांवरून त्याच्या सांगण्यास प्रत्यंतर मि- ळाल्यावांचून त्याचे ह्मणणे खरें मानण्याविषयीं फार सावध राहिले पाहिजे. पांडच्या फिर्यादीसंबंधीं अहमदनगरच्या फर्स्ट असिस्टंट माजिस्त्रेट साहेब यां जपुढे चौकशी झाली, त्याबद्दल त्यांनीं माजिस्ट्रेट साहेबांस रिपोर्ट केला यांत ते असे लिहितात:- 'साक्षीदारांपैकी पुष्कळ लोक पांडूच्या दुसन्या लग्नाविषयों आपल्यांस कांहीं माहीत नाहीं असे ह्मणतात, आणि त्याजवर जर विश्वास ठेविला तर त्यावरून असे दिसून येतें कीं, पांडू आपल्या पहिल्या बायकोच्या आईबापास ल क्ष्मीबाईचे आईबाप ठरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याने काही दिवसांवर त्या- च्या गांवांतील आनंदी नांवाच्या स्त्रीवर ती आपली लग्नाची बायको आहे असा दा- वा केला होता. याबद्दळ राहुरी तालुक्यांत काम चाललें होतें तें माँ तपासलें. त्यावरून मला असे दिसून आळें कीं, जेव्हा ती स्त्री आपल्या ताब्यांत आपण घेऊं शकत नाहीं असें पांडूस वाटळें तेव्हां त्यानें तिजवर चोरीचा ही आळ आणिला होता.' सदहू नाजिस्ट्रेट साहेब यांजपुढे पांडूनें अशी तक्रार केली होती कीं, मोहनाजी ढांडे नांवाचा मनुष्य गायकवाडाच्या तर्फे लांच देऊन खोटा पुरावा बनवीत आहे. याबद्दल असिस्टंट मजिस्ट्रेट साहेब यांचें ह्मणणे असें आहे कीं, राहुरी तालुक्यां- तीळ कांहीं गांवचे लोकांनीं दहापासून पन्नास रुपयेपर्यंतच्या नोटा राहुरी तालु क्याच्या तिजोरींत विकण्यासाठी आणिल्या होत्या. यावरून कांही दिवसांमागें कोटू- न तरी बाहेरून पैसा आणून राहुरी तालुक्यांत खर्च केला असे वाटतें व पांडू ह्मण- तो त्याप्रमाणे साक्षीदारांच्या नांवांची यादी होपसाहेब यांस दिली होती. ती गाय- कवाडांच्या एजंटांनी साक्षीदार फोडण्यासाठी मिळविली असेल; परंतु त्यानंतर पांडू- ने ज्या साक्षीदारांची नांवें सांगितली व काही मी स्वतः होऊन बोलाविले ते देखील