पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आली आहेत आणि त्यांत एक नवें संकट डोक्यावर ओढून आणितां हे चांगलें नाही. या दुराग्रहाचा परिणाम फार वाईट होईल; परंतु त्या हटवादी राजानें असे उत्तर दिले की पाहिजे ते झाले तरी चिंता नाहीं, परंतु मी लग्न करणार. महाराजांची स्वारी बडोद्यास आल्यावर लग्नसंबंधीं ज्ञातीभोजने करण्यांत आली होतीं; त्यांत मराठे मंडळींपैकी पुष्कळ शिष्ट लोक भोजनास आले नव्हते. कर्नल फेर यांनी मुंबई सरकारास ता० ५ जून सन १८७४चा रिपोर्ट केळा त्यांत असे लिहिले होतें कीं, लग्नाबद्दल अहेरांची कचेरी झाली, त्या कचेरीला मरा- ठे मंडळी आणि सरदारलोक नजराणा करण्यासाठी हजर झाले होते. त्यांस महारा- जांनीं विनंती केली, कीं तुझी रखमाजीराव (लक्ष्मीबाई साहेब यांचा बाप) यांच्या घरीं भोजनास यावे; परंतु त्यांनी महाराजांस मर्यादेने विनंति केली की लक्ष्मीबाई व त्यांचा बाप मराठचाच्या जातीचे नाहीत; यास्तव त्यांच्या येथे जे भोजनास जातील से ज्ञातीभ्रष्ट होतील, आणि त्यामुळे त्यांच्या कन्या मराठी जातींत कोणी वरणार नाही व दुसऱ्याही ज्ञातीच्या हक्कापासून ते भ्रष्ट होतील. आणखी असे लिहिले होतें कीं यापूर्वी एक दोन दिवसांवर अशी बातमी पसरली होती की जर मराठे व सरदार मोजनास येण्यास नाकबूल होतील तर त्यांजवर जुलुम करण्यांत येईल. असे ह्मणतात की पोलीस आणि पलटणचे लोक जुलूम करण्यासाठी तयार ठेविले होते परंतु जुलूम करण्यांत आळा नसून, या प्रसंगी फौज हुकूम ऐकेल किंवा नाहीं याविषयीं देखील संशय आळा होता. ज्ञातीच्या संबंधाने मराठे मंडळींची कुरकुर होती आणि प्रत्यक्ष महाराजांचा जा मात, कमासाहेब यांचे भ्रतार देखोल भोजनास आले नव्हते ही गोष्ट खरी आहे. परंतु भर दरबारांत महाराजांचे आणि सरदार टोकांचें वर लिहिल्याप्रमाणे भाषण झाले होते आणि जुलूम करण्यासाठी फौज तयार ठेवली होती या ह्मणण्यास काहीं खरेपणा नाहीं. बातमी देणाराचे आणि ऐकणाराचें हें बुद्धिवैदक्षण्य आहे. तारीख ८ जून रोजीं रावसाहेब बापूभाई व गोविंदराव मामा रेसिडेंट साहेब यांच्या भेटीस गेले, तेव्हां ते त्यांस ह्मणाले कीं, आह्मीं असें ऐकिलें आहे की जो कोणी रखमाजीराव यांच्या येथे भोजनास जाणार नाही त्यास महाराज बेड्या घाल- तील, बरतर्फ करतील, व साटमारांकडून फटके मारवितील असे कोणी आपणास सांगितळें आहे; परंतु त्यांपैकीं कांहीं एक खरें नाहीं. गुजराथेत अशी एक म्हण आहे की 'कहनेवाला दिवाना पण सुननेवाला बी दिवाना' त्याप्रमाणें कोणी दिवान्यानें (वेड्याने) कांहीं भलतेच सांगितलें असेल; परंतु आपण विचार केल्यावांचून ती गोष्ट खरी मानूं नये. कर्नल फेर साहेब यांस याप्रमाणे सूचना करण्यांत तुझी ही दिवान्याप्रमाणे जें कांहीं कोणी सांगेल तें खरें मानितां असे अन्योक्तीनें बोषित केले असतां त्याबद्दल- त्यांस कांहीं राग आला नाहीं याचे मोठें नवल वाटतें. याच कामदारांनी खाजगी ना. त्यानें लग्नास यावें अशी साहेब यांस विनंति केली होती ती आपली बेअदबी केली