पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री० सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह. (७१) , कचेरीत उभ्या उभ्या ती यादी दिवाणाच्या स्वाधीन केली आणि ह्मणाले की, जर तुझी लग्नाचे आमंत्रण करण्यास याल तर रेसिडेंट साहेब तुमची भेट घेणार नाहीत. असे करण्यांत रेसिडेंट साहेब यांनी उघड रीतीने आपला अपमान केला असे महाराजांस वाटल्यावरून त्यांनीं रेसिडेंट यांस याबद्दल एक यादी लिहून मुंबई सर कारास एक खलिता लिहिला. रोसडेंट साहेब यांस यादी लिहिली त्यांत असे लिहिले होते की, सांप्रदायाप्रमा णें मी तुझांस मान देत असतां तुझीं उत्साहाच्या प्रसंगी माझा सर्व प्रकारें अपमा- न केलात. मुंबई सरकारच्या खळिव्यांत महाराजांचें ह्मणणें हेच होतें कीं, रेसिडेंट यांनीं अक्षत देण्यासाठी माझ्या दिवाणास येऊं द्यावयाचे होते; बोवी साहेबांस पाठवून भर कचेरींत त्यांजकडून दिवाणास असे सांगवावयाचे नव्हतें कीं, अक्षत देण्यास तुझी आला तर रेरोसिडेंट तुझांस भेटणार नाहीत. असे करण्यांत त्यांनी माझ्या प्रजे- देखत माझा अपमान केला आहे. या खलित्याच्या उत्तरांत मुंबई सरकारांनी महाराजांस असे लिहिलें कीं, आप- ल्या कारभाऱ्यामध्ये आणि रेसिडेंट साहेब यांजमध्यें लग्नसंबंधीं झालेले भाषण आ पणांस कळविले नाही यामुळे लग्नाच्या दिवशीं आपण दोन कलाक पूर्वी रेसिडेंट यांस लग्नास जाण्याविषयीं सरकारांनीं मनाई केली असतां हो त्याजबद्दल यादी पा ठविली. कर्नल फेर यांनी कोणत्याही रीतीनें उघड अपमान होऊं नये व अक्षतीकरितां जाण्याची तयारी महकूब व्हावी ह्मणून बोवी साहेब यांजबरोबर या दी पाठविली. असे करण्यांत त्यांनीं कांहीं आपला अपमान केला नाहीं. महाराजांच्या खलित्याबरोबर रोसडेंट साहेब यांनी एक लांबच लांब रिपोर्ट केला होता. त्यांत महाराजांच्या वर्तणुकीवर पुष्कळ टीका केली होती व दादाभाई नवरोजी यांजवर तर ते इतके खपा झाले होते कीं, दादाभाई यांनी महाराजांस खलिता लिहून दिला यांत यांनी जसे काय अघोर पातक केलें होतें. तारीख ६ मे रोजी मुंबई सरकारांनी पुनः गवरनर जनरल यांस एक तार पाठ- विली. त्यांत पांडूची फिर्यादी खोटी दिसते, त्यास खोटे आरोप आणण्याची संवय लागली आहे व त्याची वाईट चाल पोलिसास माहीत आहे. परंतु लग्नाच्या यथा- योग्यपणाविषय अद्याप संशय घेण्यासारखें आहे ह्मणून गवरनर साहेब यांस वाटतें कीं, पूर्वीच्या हुकुमांत कांहीं फेरफार करण्याची गरज नाहीं, असे कळविले होतें. त्याचे उत्तर तारीख ७ मे रोजीं व्हाईसराय साहेब यांजकडून असें आलें कीं तर मग पूर्वीचा हुकम कायम राहू द्या. तारीख ७ मे रोजी महाराजांनी श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब यांजबरोबर लग्न केले आणि त्यांचे दुसरे नांव पार्वतीबाई ठेविलें. गोविंदराव मामा यांनी लग्नापूर्वी महाराजांस फार निक्षून सांगितले की आपण लग्न करूं नका. सध्यां आपला दिवस चांगला नाही, आपल्यावर अनेक संकट