पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. गवरनर जनरल आणि मुंबईचे गवनर यांस लग्नपत्रिका लिहिण्याचा व रेसिडेंट यांस अक्षत देण्याचा सांप्रदाय आहे तो आपल्याकडून आपण करावा भ से महाराजांस वाटले आणि तसे करण्यांत कांहीं हरकत दिसली नाहीं. सचच सर्वां- नीं त्यास अनुमोदन दिले. ' ता० ७ मे रोजी लग्नाचे दिवशीं प्रातः काळचे नऊ वाजता रावसाहेब बापूभाई द याशंकर यांनी दोन्ही सरकारच्या नांवाचे दोन्ही खलिते आणि रोसैंडेंट साहेब यांचे नांवची यादी रेसिडेंट साहेब यांस देऊन लग्नाचे आमंत्रण करण्यासाठी दि- वाण साहेब अकरा वाजतां येतील असे सागितले आणि साहेब यांनी 'अच्छा' म्ह णून उत्तर दिलें. रोसडेंट साहेब यांची रजा घेऊन बाजुभाई गेले आणि कांहीं मि- निटांनी रस्त्यांतून परत येऊन साहेब यांस विचारिलें कीं, दिवाण वाजत गाजत समा- रंभानिशीं येणार आहेत. यासाठी आपणास फुरसत असेल ती वेळ सांगावी. साहेब यांनी थोडासा विचार करून उत्तर दिले की, अकरापासून बाराचे भांत यावें. माँ बर जो मजकूर लिहिला आहे तो बापुभाई यांनी स्वहस्ताने लिहिलेल्या रोजनिशीच्या आधारानें लिहिला आहे, पण याजबद्दल रेसिडेंट साहेब यांचे ह्मणणे निरा- ळेच आहे. बापुभाई यांनी अकरा वाजतां दिवाण येतील असे आपणांस सांगितल्याचें रोसेडेंट साहेब कबूल करितात; परंतु लमाचें आमंत्रण करण्यासाठी येणार आहेत अर्से बापुभाई त्यांजपाशी बोलले होते हैं यांस कबूल नाहीं. नेहेमीप्रमाणे यादी दे- ण्याकरितां दिवाण येणार असतील असा बापुभाईच्या सांगण्याचा भाव मी सजमलों असे ते ह्मणतात, पण यादी देण्यासाठी दिवाण यास जावयाचे असले ह्मणजे रेसिडेंट यांस अगोदर सूचना करण्याचा मुळींच सांप्रदाय नव्हता. दुसऱ्या वेळेस बापुमाई यांनी परत येऊन रोसेडेंट साहेब यांस जी सूचना केली त्याविषयों देखील रोसेडेंट साहेब यांचें ह्मणणे दोन प्रकारचे आहे. तारीख ७ मे सन १८७४ नंबर १२६/४७९ च्या रिपोटांत त्यांच्या लिहिण्यांत असें आहे कीं, मी कचेरीत जाऊन मराठी यादीचें भाषांतर पाहिले तेव्हां मला स- मजले की, लग्नाबद्दल आमंत्रण करण्यासाठीं दिवाण मजकडेस येणार आहेत आणि महाराजांनी तारीख ९ मे सन १८७४ चा मुंबई सरकारात खलिता लिहिला यात बापुभाई यानीं रेसिडेंट साहेब यांस विधिपूर्वक अक्षत देण्याकरितां दिवाण येणार आहेत असे स्पष्ट सांगितले होते, असे जेव्हा लिहिलें तेव्हां तारीख ९ नंबर १३४ | ४६४ च्या रिपोर्टीत ते असे लिहितात कीं, दुसऱ्या वेळेस बापुभाई परत येऊन दिवाणानें केव्हां यावें याविषयी विचारलें, तेव्हा ते अक्षत देण्याच्या संबंधाने बोल. ल्यावरून मी त्यांस सांगितलें कीं, यादीचे भाषांतर जाऊन पहातों. असा त्यांच्या लेखांत विरोध आहे. कर्नल फेर यांस लग्नाचें आमंत्रण करण्याकरितां दिवाणास आपल्याकडे येऊं दे- णे प्रशस्त वाटलें नाहीं. त्यांनीं लागलींच महाराजांस यादी लिहिली आणि ती आ. पले असिस्टंट बोवी साहेब यांजबरोबर दरबारांत पाठविली. बोवी साहेब यांनीं भर