पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री० सी० लक्ष्मीबाईसाहेब यांचा विवाह.

(६९)

कारांनीं मनाईचा हुकुम दिल्यावांचून चालू क्रमामध्ये हरकत करण्याचे मला कांहीं कारण दिसत नाहीं. कारण, लग्नकाळी मी विद्यमान असलो ह्मणून कांहीं पांडू यानें आपले ह्मणणे खरें केले असतां तें लग्न कायदेशीर मानले जाणार नाही. यासाठी तारायंत्रद्वारे मनाईचा हुकुम मला आला नाहीं तर मी सन्मान देण्यासाठी लष्करी लोकां- सह लग्नास जाईंन. पांडूच्या फिर्यादीचा निकाल होईपर्यंत लग्न तहकूब ठेवण्याविषय महाराजांस सल्ला देणें किंवा न देणें हें सरकारच्या विचारावर आहे.
 मुंबई सरकारांनी रेसिडेंट यांस तारीख ३० एप्रिल रोजी तारायंत्राने असा हुकूम दिला कीं, तुझीं सरकारच्या हुकुमावांचून लग्नास जाऊं नये, व लष्करी मान देऊं नये. आणि नंतर गवरनर जनरलची परवानगी घेऊन त्यांस शेवट हुकूम असा दिला की लष्करी मान द्यावा, कारण सांप्रदाय आहे ह्मणून सरकाराने लग्नास गर्भित संमति दिली असे म्हणू शकवणार नाहीं, परंतु लग्नाच्या उचितपणाबद्दल तुझी शंका घेतां यासाठी लग्नास तुझी जाऊं नये.
 ऐसिडेंटाने लग्नास जावे व लष्करी मान द्यावा किंवा नाही याबद्दल गवरनर जन- रल यांची परवानगी मागतांना एकदम हकीकत कळविण्यांत बरेच अलक्ष झाले होते. तारीख ३० एप्रिल रोजी मुंबई सरकारांना जी तार पाठविली ती फक्त लष्करी मान देण्याचा सांप्रदाय आहे इतके मात्र कळविलें होतें. व त्याबद्दल गवरनर जनरल यांनीं परवानगीही दिली होती. रेसिडेंट साहेब यांस लग्नसमारंभात जावे लागते, ही गोष्ट गवर- नर जनरल यांस मागाहून कळविण्यांत आली व त्यांत या लग्नास अपवाद आहे आणि रेसिडेंट साहेब लग्नास गेले व लष्करी मान दिला तर लग्नास अनुमति दिली असें होईल असे मुंबई सरकारांनी आग्रहपूर्वक कळविल्याने लष्करी मानाबद्दलचा हुकूम तर गवरनर जनरल यांनी कायम ठेविलाच; परंतु लग्नाच्या याथार्थ्याविषयीं रेसि डेंट यांस संशय आहे, तर त्यांनी लग्नास जाऊं नये असा हुकूम दिला.
 रेसिडेंट साहेब लग्नास गेले आणि लष्करी मान दिला तर लग्नास अनुमति दिली असें होईल असें जें मुंबई सरकाराचे ह्मणणें होतें तें चुकीचे असून ती गोष्ट गवरनर जनरल यांनी ही कबूल केली नाही. सांप्रदायाप्रमाणे लग्नास जाण आणि लष्करी मान देणें यांत ती लग्नास मान्यता कशाची ? गायकवाडाकडून रेसिडेंट यांस आमंत्रण करण्याचा जो सांप्रदाय आहे तो कांहीं लग्नास इंग्रज सरकारची मान्यता मिळविण्याकरितां नाहीं; केवळ तो एक शिष्टाचार असून लष्करी मान दे- ण्याचा सानदाय पडला आहे त्यामुळे त्याबद्दल गायकवाडाचा एक हक्क झाला आहे.
ता० ५ रोजों रेसिडेंट साहेब यांनी महाराजांच्या दिवाणात मुंबई सरकारचा हु- कम कळावेला, आणि रेसिडेंट साहेब यांचें येणें होत नाहीं ह्मणून लष्करी मानाची देखील गरज नाहीं असें पेसिडेंट यांस दिवाणानें सांगितले.
 ता० ६ मे रोजी रावसाहेब बापुभाई दयाशंकर आणि गोविंदराव मामा खासगी- नात्यानें रोतेर्बेट साहेब यांनी लग्नास यावें ह्मणून त्यांचे मन वळविण्यास गेले होते. परंतु त्यांनी लग्नास येण्याचे कबूल केले नाहीं.