पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३. मल्हारराव महाराज यांच्या मंडळीचा उत्कर्ष. मल्हारराव महाराज यांच्या मंडळीचा उत्कर्ष, राजद्रव्याचा अवि- चारानें विनियोग, त्याची कारणें, महाराजांच्या उदारपणाचें प्रशंसन. मल्हारराव महाराज बडोद्यास आल्या बरोबर त्यांच्या पूर्वाश्रमांतील सर्व मंडळी लाग- लीच त्यांच्या भोवती एकत्र झाली हे मागे सांगितलेच आहे. महाराजांचा अति जिवलग मित्र बळवंतराव राहुरकर व दुसरी कांहीं मंडळी बडोद्यास हजर नव्हती तीही एका मागून एक आपआपल्या सवडीप्रमाणे बडोद्यास आली. सर्व मंडळीमध्ये बळवंतराव राहुरकर महाराजांचा फार आवडता होता असे तेव्हांच दि- सून आले. त्यास लवकर येण्याविषयीं महाराज यानीं तार केली होती, व त्याच्यासाठी महाराज नित्य मुंबईहून येणाऱ्या गाडीच्या वेळेवर स्टेशनावर जात असत. असे म्हणतात कीं, बळवंतराव याजपाशीं, त्या वेळेस, अगदी साधी वस्त्रे सुद्धां धड नव्हती यामुळे ती मिळवितांना त्यास एक दोन दिवस ज्यास्त लागले. महाराजांचे मेव्हणे म्हणजे महाराजांची पहिली स्त्री भागूबाई यांचे बंधु शिवाजीराव खानविलकर, ज्यांस नानासाहेब खानविलकर म्हणतात हेही कोकणांतून लवकरच बडो- द्यास आले. व्यंकटराव मास्तर महाराजांच्या खुशामती मंडळीपैकी नव्हता. महाराजांच्या मंड- ळींत साक्षर म्हणण्यासारखे काय ते दोघेच होते; एक व्यंकटराव आणि दुसरा बाजीराव व्यंकटराव याने मल्हारराव महाराजांच्या सुटकेसाठी एक सारखा सतत उद्योग केला होता. तो बडोद्यास आल्यावर त्याची महाराज यांनी आरंभी उत्तम प्रकारची बरदास्त ठेविली होती, परंतु पुढे लवकरच असे दिसून आले की, तो ज्या ऐश्वर्याची व अधिकाराची' इच्छा करीत होता तो अधिकार त्यास महाराज यांजपासून मिळावयाचा नव्हता. राणीसाहेब जमनाबाई प्रसत होईपर्यंत काय ती आपल्या सत्तेची अवधी आहे असे मल्हारराव महाराजांस वाटले होतें, सबब त्यांनी आपल्या मेहरबानींतील मंडळींस आपल्या कृपेच्या प्रमाणाने मोठमोठी बक्षिसे व हत्ती, घोडे, पालख्या, छत्र्या, मशाली इत्यादि बहुमान दिले. बहुत करून सर्व मंडळींस वर्षास बहात्तरशे रुपयांच्या नेमणुका करून दिल्या होत्या. त्यापैकी कांहीं रक्कम वंशपरंपरा त्यांस मिळावी अशा सनदा करून दिल्या होत्या. ब्राम्हण मंडळीस जी चोवीसशे रुपयांची वर्षासने करून दिली होती त्या सनदेत असे शब्द होते :-- - “सदहू वर्षासनाचा उपभोग सालदरसाल तुम्ही व तुमचा पुत्रवंश अथवा कन्यावंश अगर पुत्रवंशांनी किंवा कन्येच्या वंशांनी दत्तक घेतला तथापि त्यांनीही वंशपरंपरेनें घेऊन