पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६८)
मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास.

 या लग्नाच्या संबंधाने कर्नल फेर यांनी मुंबई सरकारास तारीख २३ एप्रिल सन १८७४ रोजी पहिला रिपोर्ट केला. सांत 'दोन महिन्यांपूर्वी मला कोणी अशी खबर दिली होती की, कोणी एक मनुष्य आतांच दक्षिणेतून आला आहे, आणि तो मी लक्ष्मीबाईचा नवरा आहे असें ह्मणत असून, त्याबद्दल मजपुढे फिर्याद करण्यास इच्छीत आहे. मी विचार करून त्यास असे सांगून पाठविलें कीं, तो ज्या जिल्ह्यांतील रहाणारा असेल त्या जिल्ह्याच्या माजिस्टापुढे त्याने फिर्याद करावी, असे लिहिलें होतें.
 याजवरून असें दिसतें की, महाराजांनी लक्ष्मीबाई साहेब यांजबरोबर लग्न करण्याचा विचार मनांत आणिल्यापूर्वी दोन महिने अगोदर पांडू बिन गोविंदा खांडवे याच्या तर्फे कोणी तरी कर्नल फेर यांस त्याची फिर्याद त्यांनी ऐकावी असे सांगितलें होतें. हा सांगणारा मनुष्य कोण, स्वास पांडूच्या तर्फे रेसिडेंट यांजजवळ मध्यस्थी करण्याचा अधिकार काय, व प्रत्यक्ष पांडूच्या विनंतीवांचून त्या मध्यस्थाचें ह्मणणे ऐकून त्याजबरोबर पांडू यास ज्या जिल्ह्यांत तो राहत असेल त्या जिल्ह्यांतील माजापुढे फिर्याद करण्याविषयीं सांगून पाठविण्याची रेसिडेंट यांस गरज काय, या गोष्टी मनांत आणिल्या असतां असें सहज दिसून येतें की, महारा- जांच्या प्रतिपक्ष्यांची या संबंधाने अगोदरपासून कारस्थानें चालू होतीं, व त्यांनी रेसिडेंट यांचे कान भरण्यास आरंभ केला होता.
 तारीख १७ एप्रिल रोज पांडू यानें रेसिडेंट साहेब यांनकडेस अर्जी केली त्यां- तत्याने लक्ष्मीबाईसाहेब आपली लग्नाची बायको आहे व यांजपाशी प हिल्या बायकोपासून झालेला मुलगा आहे, यासाठी मुळासुद्धां त्यांस आपल्या स्वाधीन करावे असा दावा केला.
 या अर्जाचे जबाबांत रोसेडेंट साहेब यांनीं पूर्वी जसें त्यास सांगून पाठविलें होतें त्याचप्रमाणे लेखी हुकुमाने कळविलें.
 हा मजकुर रोसडेंट साहेब यांनी नानासाहेब खानवेलकर यांस नवसरी मुक्कामी ता. २३ एप्रिल सन १८७४ रोजी कळावला. त्यांचे उत्तर त्यांनी रोसेडेंट साहेब यांस असे दिलें कीं, मी देखील कोणी एक मनुष्य बडोद्यात आला होता असे ऐकिलें होतें व त्यामुळेच महाराजांनी लग्न करण्याचें तहकूब ठेविलें हेोते; परंतु काळजी- पूर्वक चौकशी केल्यावरून त्या मनुष्याचे ह्मणणे खरें नाहीं अशी खात्री झाली आहे. आणि ह्मणून तारीख २७ एप्रिल रोजी महाराज लग्न करणार असून त्याबद्दल खलिता लिहिण्याच्या विचारांत आहेत.
 तारीख २८ एप्रिल रोजी कर्नल फेर यांनी मुंबई सरकारास दुसरा एक रिपोर्ट केला. त्यांतील त्यांच्या लिहिण्याचे तात्पर्य असं: -- महाराज लक्ष्मीबाई बरोबर तारीख ६ मेच्या सुमारास लग्न करणार असे मला दिवाणाने कळविलें आणि सां- प्रदायाप्रमाणे सन्मान देण्यासाठी लष्करी लोक बडोद्याहून आणविण्या विषय विनंती केली. लग्नसमय लष्करी मान देण्याचा सांप्रदाय आहे. मुद्दाम सर-