पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १५. श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाई ऊर्फ पार्वती. बाईसाहेब यांच्या लग्नसंबंध हककित. श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाईसाहेब यांजबरोबर विधिपूर्वक लग्न करण्याविषयीं महाराजांचा निश्चय - लक्ष्मीबाई माझी लग्नाची बायको आहे अशी पांडू बिन गोविंदा खांडवा याची रेसिडेंट साहेब यांजकडे फिर्याद - रेसिडेंट साहेब यांनी लग्नास जावें किंवा नाही यासंबंधीं गवरनर जनरल आणि मुंबई सरकार यांजमध्ये वाटाघाट-लग्नास जाण्यास रेसिडेंट साहेब यांस मनाई - रेसि- डेंट साहेब यांनी अपमानपूर्वक लग्नाच्या अक्षतीचा अनंगीकार केल्याबद्दल महाराज यांची मुंबई सरकाराकडेस फिर्याद आ- णि तिची निष्फळता - महाराजांनी लक्ष्मीबाईबरोबर लग्न केल्या- मुळे ज्ञातीच्या लोकांमध्ये असंतोष - लक्ष्मीबाई साहेब यांचें पु- त्रजनन - पांडू याची फिर्याद खोटी पडल्यानंतर लक्ष्मीबा- ईचा मुलगा महाराजांचा भौरस कबूल करण्याविषयीं मुंबईसर- कारची गवरनर जनरल यांस शिफारस आणि तिची सफल- ता विषप्रयोगाचे प्रकरण उपस्थित झाल्यामुळे तो हुकूम अ- मलांत आणण्याची तहकुबी - या प्रकरणाबद्दल गुणागुणविवेचन. मल्हारराव महाराज यांनी श्रीमंत सौभाग्यवती लक्ष्मीबाईसाहेबांबरोबर गांधर्व विवाह करून त्यांचा इतमाम महाराजांची पट्टराणी श्रीमंत सौभाग्यवती म्हाळसाबाई- प्रमाणे ठेविला होता असें आलीं मागें लिहिलें आहे. सन १८७४ च्या एप्रिल महिन्यांत महाराज नवसरीस गेले होते, तेथें त्यांनी त्यांजबरोबर विधियुक्त लग्न करण्याचा निश्चय केला. यावेळेस त्या पांच महि- न्याच्या गरोदर होत्या. ब्ल्यू बुक नंबर २ आणि रावसाहेब बापुभाई दयाशंकर यांनीं एक रोजनिशी लिहून ठेविली आहे त्यांजवरून हे लग्न करण्याविषयीं महाराजांच्या मनांत गोष्ट आल्यापासून शेवटपर्यंत या संबंधाने ज्या गोष्टी घडून आल्या यांविषयीं माहिती मिळते.