पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (६५) १ लष्करी लोकांच्या नेमणुको कमी करण्याबद्दल रेसिडेंटाचे विचारें महारा- जांनी सर्वसाधारण असे कांहीं नियम करावेत, ह्मणजे त्या लोकांस आप ल्या चाकरीचा अशाश्वतपणा वाटणार नाहीं. २ विजापूरच्या ठाकूरलोकांपासून जमाबंदीबद्दल कांहीं वर्षांच्या कालमर्या देने ठराव करून घ्यावा. ३ कामावर नेमणूक करण्याबद्दल कोणापासून नजराणा घेऊं नये, आणि त्याच- द्दल जाहीरनामा प्रसिद्ध करावा. 8 जमिनीवरील सारा कायम झाला असल्यास मग राज्यासनप्राप्तीबद्दल न- जराणा घेऊं नये. ५ जमाबंदी वसूल करण्याकरितां कोणावर शरीरसंबंधी जुलूम करूं नये. ६ जमिनीवर योग्य आणि नेमस्त धारा बसवून ठरविलेल्या आटी प्रामाणिक- पणाने पाळाव्या, आणि ठरविलेल्या धान्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही नि- मित्ताने जास्त पैसा घेऊं नये. ७ वतनदार आणि इनामदार लोकांच्या हक्कांचा निकाल करण्याकरितां योग्यं व्यवस्था करून त्या लोकांची काळजी आणि असमाधान दूर करावें. ८ गुन्ह्याच्या प्रमाणापेक्षां अपराध्यांस जास्त शासने करू नयेत. ९ सावकार आणि व्यापारी लोक यांच्या संबंधाने कांहीं अन्यायाचें वर्तन क रूं नये. १० कोणाच्या बायकांस नोकरी करण्यासाठी म्हणून जबरीनें धरून आणू नये, आणि जो जबरी करील यास कडक शासन करावें. ११ स्त्रियांस कोर्टात अथवा बंदीखान्यांत, अथवा पोलिसाकडे तपास चालला असतां शरीरसंबंधी शासन करूं नये आणि तसे कोणी करोल तर यास सक्त शिक्षा देण्यांत येईल, असा जाहीरनामा प्रसिद्ध करावा. १२ कैलासवासी खंडेराव महाराज यांचे आप्त व अनुयायी यांस अन्यायाने बागवू नये, व त्यांच्या योग्यतेप्रमाणे, व त्यांच्या चाकरीच्या प्रमाणाने, यांच्या चरिता- र्थासाठी योग्य व्यवस्था करावी. १३ खंडेराव महाराज यांच्या निकटच्या आप्तांस योग्य नेमणुकी करून देऊन, राजकुटुंबांतील बायकांस, बडोदें सोडून पाहिजे तेथें राहण्यास मोकळीक द्यावी; आणि त्यांच्या नेमणुका मुंबई सरकारास पसंत होतील अशा ठरवून तो ऐवज गायकवाडांच्या तिजोरीतून त्यांस वेळेवर देत जावा. १४ दिवाण शिवाजीराव खानवेलकर, वरिष्ट कोर्टाचे न्यायाधीश बळवंतराव देव, रोवेन्यु कमिशनर हरीबा गायकवाड, सर फौजदार बळवंतराव येशवंत, आणि डेप्युटी रोवेन्यु कमिशनर नारायणभाई, जोपर्यंत अधिकारावर राहतील, तोंप यंत राज्यांत अपेक्षित सुधारणूक होईल, अशी कमिशनच्या रिपोटांवरून गवरनर जनरल यांची खात्री होत नाहीं, यास्तव त्या लोकांसाठी महाराजांस ६