पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. व तुमचे वंशाकडे तुमचें राज्य कायम राहून, रावजी आपाजी वगैरे, त्यांचे भाई भावे जे वगैरे, त्यांची पुस्त दरपुस्त, दिवाणगिरी, व कारभार जोंवरी तुमची दौलत तोवरी पुस्त दरपुस्त मशारनिल्हेसुद्धां दरम्यान बाहदर कंप- नीची असे. व राजेश्री पंतप्रधान पेशवे साहेब यांचे दरबारों तुमचे वकि लांनी आमचे वकिलास घेऊन वाजवीचे जाबसाल असतील ते करावे. " वरील कलमांत बडोद्याच्या राजानें राज्यकारभार वाईट रीतीने चालविला असतां इंग्रज सरकारांनी मध्यस्थी करून वाजवी असेल तें पहावें, अशा अर्थाचें मुळींच वाक्य नाहीं. रावजी आपाजी वगैरे यांजवर राजाकडून गैरवाजवी होऊं लागल्यास कंपनी सरकारांनीं मध्यें पडावें, असें एक वाक्य आहे. आणि तें फक्त रावजी भापाजी वगैरे मंडळींनाच लागू असून ते अगदी उपयुक्त आहे. कारण, त्या लो- कांबद्दल इंग्रज सरकारांनी बाहादारी केली होती. यात्र कलमाच्या खालीं कंपनी सरकारच्या तर्फे कर्नल वाकर साहेब यांनी काय कबूल केले ते लिहिले आहे. त्याव रून रावजी आपाजी वगैरे बाहिदाररीवाल्या लोकांच्या संबंधाने मात्र मध्यस्थी करण्या- चा इंग्रजसरकारास हक्क प्राप्त झाला होता. आणि ती बाहादारी रद्द झाल्यामुळे आतां तें कलमच रद्दी कागदाप्रमाणे झाले असून इंग्रजीमध्ये भाषांतर करतांना चक झाली असावी असे वाटतें. सन १८०२ च्या तहनाम्यामध्यें जर अशा अर्था- वाक्य नाहीं तर तो मंजूर केल्याबद्दल लिहिलेल्या पत्रांत कोठून असेल ? आतां चालू वहिवाटीप्रमाणे पाहिले असताही गवरनर जनरल यांनी जी कारणें दाखविलीं आहेत, त्यांवरूनही तसें स्थापित होत नाहीं. गायकवाडच्या जमाखर्खाव- र रेसिडेंट साहेब यांचे निरीक्षण गायकवाड वरील कर्जाच्या फेडीकरितां इंग्रज सर- कारांनी जामिनकी केली होती त्यामुळे होते. त्याचप्रमाणें त्यांच्या मुलुखापैकीं कांहीं परगणे इंग्रज सरकारांनीं आपल्या वहिवाटीत कर्जाची फेड करण्या- साठींच घेतले होते. आतां दरबारच्या कामदार लोकांस बदसलागार ठरवून दर- बारांतून काढून देवविले होते. पण तें देखील राज्यकारभार वाईट रीतीने चालवि ला होता ह्मणून नव्हतें. इंग्रज सरकारची ज्या लोकांस बाहादारी होती त्या लो- कांविषयीं महाराजांच्या मनांत द्वेष उत्पन्न करून, इंग्रज सरकाराबरोबर एक गायक- वाड सरकारची एकरंगी दोस्ती चालत आली आहे तीस व्यत्यय आणितात असे मनगटाच्या जोरावर कामदार लोकांवर आरोप आणून त्यांस दूर करविल्याचीं कांहीं उदाहरणे आहेत. बडोद्याच्या दरबारची जी कांहीं माहिती आहे व कागदपत्रांवरून जे कांही दिसून येतें, त्यावरून इंग्रज सरकारात तहनाम्याने अथवा वहिवाटीनें बडोद्याच्या राज्यकार- भारत हात घालण्याचा हक्क प्राप्त झाला नाहीं, ही गोष्ट निर्विवाद आहे. आतां ते प्रबळ राजे आहेत यांनी जर केलेले कौलकरार न पाळले तर त्यांचे करायचे काय !! गवरनर जनरल यांनीं रेसिडेंट साहेब याचे द्वारे महाराजांस सल्ला दिल्या त्यांत खाली लिहिलेल्या बाबी होत्या:-