पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबाच्या मिनिटाचें गुणदोष विवेचन. (६३) आपल्यास साह्य करतील. कांहीं महत्वाच्या गोष्टींबद्दल सल्ला देण्याविषयी मीं रोसडेंटस हुकूम दिले आहेत. त्या सल्ला ते आपल्यास कळवितील. आपण आपला राज्यकारभार सुधारग्याकरिता कोणते उपाय योजिले, याबद्दल- तारीख ३१ डिसेंबर सन १८७५ पर्यंत रिपोर्ट करण्याविषयी रेसिडेंटास हुकूम दिला आहे. आणि मला आशा आहे कीं, सदहूँ मुदतीच्या आंत राज्यकारभारांत योग्य रीतीची सुधारणा करून जो शेवटचा उपाय करण्याविषयीं मी अगदीं नाखुष आहें, तो करण्याचा प्रसंग आपण मजवर आणणार नाहीं. गवनर जनरल यांनी गायकवाड सरकारच्या राज्यकारभारांत मध्यस्थी करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे असे प्रतिपादन केले आहे. याविषयीं थोडा विचार कर्तव्य आहे. बडोद्याच्या राजास सल्ला देण्यापलीकडेस कोणतेही कृत्य केले तर तेर्णेकरून गायक-- वाडाबरोबर जे तहनामे केले आहेत त्यांस बाध येणारच, असें टकर साहेब यांनी आपल्या मिनिटांत लिहिले असून गवरनर जनरल आपल्या खलित्यांत अमुक तहनाम्याच्या अमुक कलमावरून हा हक्क प्राप्त झाला आहे असें कांहीं स्पष्टपणे लिहीत नाहींत. चालू वहिवाटीने आणि तहनाम्यावरून इंग्रज सरकारास हक्क प्राप्त झाला आहे, असे मोघम झणतात. सन १८०२चा तहनामा आनंदराव गायकवाड यांनी मंजूर करून मुंबई सरका- रास एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या इंग्रजी भाषांतरांत अशा अर्थाचे एक कलम आहे की, जर मी स्वतः अगर माझे वंशज कांहीं अयोग्य अथवा अन्यायाचे बर्तन करतील तर, इंग्रज सरकारांनी मध्ये पडावें, आणि तें काम न्यायानें अगर यथायोग्य रीतीने झाले आहे किंवा नाहीं हें पाहवें. * या कलमावरून बडोद्याच्या आतील राज्यकारभारांत मध्यस्थी करण्याचा आपणास हक्क प्रात झाला आहे, असा इंग्रज सरकारास दावा सांगण्यास सवड झाली आहे. पण मराठी पत्राची नक्कल दरबारच्या दप्तरी आहे, त्यामध्ये तशा अर्थाचा मजकूर नसून तें कलम खाली लिहिल्याप्रमाणें आहे:- "मेजर वाकर यांनी बोलणे करून कलमबंदी लिहून दिली तो आह्मी कबूल करितों. परंतु आह्मांस व आमच्या राज्यास व आपचे वंशाचा औरस गादी- वर असेल त्यास, व रावजी आपाजी आमचे दिवाण, व त्यांचे पुत्र, व भाई भत्रिजे, सोयरे व बाबस्ते, व माधवराव गोपाळ मजमदार, यांजवर आह्मां- कडून गैरवाजवी होऊं लागल्यास कंपनी इंग्रज बहादर यांनी मदत हरेक - विश करून, सांभाळून, कोणाचा जलेल त्यांजवर होऊ न द्यावा. त्याजवरून कंपनी इंग्रज बहादर यांचे तर्फेनें मेजर वाकर कबूल करितात कीं, तुझी

  • " Should I myself or my successors commit anything improper, or unjust, the English Government shall interfere and see in either case that it is settled according to equity and reason. " ( Aitchison's treaties, Volume VI Page 301 . )