पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. घाटीत घेतले होते, व बदसलागार लोकांस कामावरून दूर करविलें होतें. सारांश, राजांच्या व त्यांच्या प्रजेच्या हिताकरितां जेव्हा जेव्हां राज्यकारभारांत मध्यस्थी करण्याची जरूरी पडली तेव्हां तेव्हां ब्रिटिश सरकारांनी मध्यस्थी केली आहे. अहो माझे मित्र, कोणी गैर मार्गाने चालला असतां त्याचें संरक्षण करण्याकरितां ब्रिटिश सरकारचा फौज कामास लावण्याचे माझ्याच्याने कबूल करवत नाहीं. जी राज्ये ब्रिटिश सरकारच्या संरक्षणाखालीं आहेत त्यांची राज्यव्यवस्था चांगली असण्याची जबाबदारी इंग्रज सरकारावर आहे. बडोद्याच्या राज्यकारभारांत मध्यस्थी करण्याची ब्रिटिश सरकारांनी आजपर्यंत क- धीही इच्छा केली नाहीं. व माझीही तशी इच्छा नाहीं. राजानें जर वाईट राज्यकारभार चालू दिला, बडोद्याच्या राष्ट्राच्या प्रजेस योग्य न्याय दिला नाहीं, त्यां- च्या जीविताचे आणि मिळकतीचे योग्य रीतीने रक्षण केलें नाहीं, आणि देशाच्या व लोकांच्या कल्याणाकडे अगदी अलक्ष केलें, तर ब्रिटिश सरकारच्या राज्यांतील असदाचरण दूर करून उत्तम राज्यव्यवस्था स्थापित करण्याकरितां मध्यस्थी करतीलच. आपल्या प्रजेच्या हितासाठी दुष्ट पद्धतीला प्रतिबंध करण्याकरितां मध्यस्थी करण्यास नसे इंग्रज सरकार बांधले गेले आहेत तसेच आपल्या मित्रपणाच्या संबंधाने आपले हित करण्यासही बांधले गेले आहेत. मानमरातब, राज्यकारभारांत ज्या कमिशन नेमण्याची अगदी जरूर होती असें कमिशनच्या रिपोर्टविरून सिद्ध झाले आहे. कमिशनचे अधिकारी यांनी महाराजांचा अधिकार, मोठेपणा, आणि यांजकडेस पूर्ण लक्ष देऊन आपले काम उत्तम रीतीनें बजाविलें आहे. कमिशन यांनीं आपल्या रिपोर्टाच्या दहाव्या कलमांत ज्या सूचना केल्या आहेत त्यांजकडे माझे लक्ष लागले असून राष्ट्राच्या हिताकरितां ज्या कांहीं चांगल्या गोष्टी करावयाच्या त्याविषयीं मी फार उत्सुक आहे, असे आपण कळविल्यावरून मला फार आनंद झाला आहे. मीही आपल्यास परम उत्सुकतेनें सल्ला देतों की आपल्या राज्यकारभारांत ठिकानू सुधारणा करण्यासाठी आपण वेळ न घालवितां कमिशनांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यांकडे लक्ष द्यावे. कांहीं वाईट गोष्टी घडल्या आहेत, त्यांचे विशुद्धिकरण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपले कारभारी आपणच निवडावे. पण माझ्या उपदेशा- प्रमाणें आणि माझ्या तर्फे रेसिडेंट आपल्यास उपदेश करतील त्याप्रमाणें राज्य कारभारांत जर आपण सुधारणूक करणार नाहींत तर आपल्या हातांतून राज्य- सत्ता हिसकून घेऊन जेणेंकरून राष्ट्रांचे हित होईल अशी राज्याची व्यवस्था करणें ब्रिटिश सरकारास भाग पडेल. आपली परीक्षा पाहण्याकरितां आपल्या विनंती- प्रमाणे मी आपल्यास सवड दिली आहे आणि मला पूर्ण आशा आहे की, आपला राज्यकारभार उत्तम स्थितीस आणण्यास आपण मनापासून झटाल. ब्रिटिश सरका- रच्या नौकरीतील कामदारांची गरज लागल्यास आपण मुंबईचे गवरनर साहेब यांस विनंती केली असतां ते आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरितां त्यांच्या शक्तीप्रमाणें