पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६० ) . . मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. फिर्यादीलोकांचे हक्क मान्य झाले आहेत, त्यांस बोलावून आणून कर्नल फेर यांच्या विद्यमानें त्या लोकांचें समाधान करून त्यांच्या राजीनाम्यांचीं पुडकीं अगोदर रेसिडेंट साहेब यांच्या द्वारें गवरनर जनरल यांजकडे पाठवून देऊन मग कमिशनच्या रिपो - टीवर उत्तर काय द्यावयाचे याबद्दल वाटाघाट करीत बसावें. कोणत्या तरी रीतीने समाधानीवर गोष्ट आणून पीडित लोकांचीं दुःखें दूर करून रोसडेंट साहेब यांची व गवरनर जनरलची मर्जी सुप्रसन्न करून घ्यावी यापलीकडे कांहीं त्या अनधीत जुन्या कामदारांचें ज्ञान नव्हतें. उपाय चतुष्टयापैकीं सामोपाय काय तो परम हितावह आहे असें त्यांच्या मनांत पूर्ण भरलें होतें तें होते. पण त्या रागद्वेषयुक्त राजास ती मसलत मान्य होणार कसची ! इतके झाले तरी त्यांच्या चित्ताचें दुर्वासनामलाप- नयन झाले नव्हतेंच- आपण जें कांहीं केलें तें कायम रहावें यांतच काय तो निर- तिशय पुरुषार्थ आहे असें त्यांनी मानले होते. त्यांचे या मसलतीचे पुढारी बळवंतराव देव, यांजवर पराकाष्ठेची खपा मर्जी झाली. त्यांनी नाना साहेब खानवेलकर यांजक- डून यांस असें सांगविलें कीं, अतः पर तुझीं या संबंधानें एक शब्द देखील काढू नये. तेव्हां अर्थात कमिशनच्या रिपोटांत जे दोष स्थापित केले होते यांबदल उत्तर काय द्यावें, याविषयच काय तो विचार करणें अवशिष्ट राहिलें. दादाभाई यांची सल्ला अशी पडली कीं, कमिशनचे रिपोर्टवर उत्तर देण्यांत कांही अर्थ नाहीं. आपण यापुढे राज्यकारभार कोणत्या रीतीने चालविणार आहोत व राज्यांत कशी सुधारणूक करणार आहोत, याबद्दल नामदार गवरनर जनरल यांस निवेदन करून महाराजांच्या सत्तेस उणेपणा येईल असें कांहीं एक करूं नये अशी प्रार्थना करावी. पण ही मसलत जुन्या कामदारांच्या पसंतीस आली नाहीं. त्यांस असें वाटलें कीं, कमिशनच्या रिपोर्टाची नक्कल मागवून याजवर त्या संबंधानें उत्तर न देणें म्हणजे कमिशनांनी स्थापित केलेले सर्व दोष कबूल करणें होय. त्या- पेक्षां रिपोर्टाची नक्कलच मागवावयाची नव्हती; अथवा मित्रभावाने मला जी सल्ला घ्यावयाची असेल त्यापूर्वी कमिशनच्या रिपोर्टची नक्कल माझ्या विचारासाठीं पाठ- वून द्या असे तरी गवरनर जनरल यांस लिहावयाचें नव्हतें. कमिशनांनीं राज्यकार- भारावर कांहीं दोष आणिले असतील, तर त्यांचें निराकरण करण्यास आम्ही तयार आहोत असा डौल तुझीच घातलात, आणि आतां उत्तर देतांना मार्गे कां स- रतां ? असा जुन्या कामदारांनी दादाभाई यांस दोष दिला. पण गत गोष्टीबद्दल काही एक न लिहितां मावी काय करावयाचें आहे तें माव लिहावे असा ते एकच आग्रह धरून बसले. या संबंधानें दोन्ही पक्षांमध्ये कांहीं दिवस बराच वादविवाद चालला. भाई जो मसुदा तयार करून आणीत त्यांचे जुने कामदार खंडन कररीत- दविवादांत दरबारच्या जुन्या कामदारांपैकी एका पंडितमन्य गृहस्थानें यांची बरीच अमर्यादा करून आपला अप्रयोजकपणा प्रगट केला. तिसंपन्न सद्गृहस्थानें आपला भ्रुकुटीभंग देखील होऊ दिला नाहीं. दादा- या वा- दादाभाई पण त्या शां- मग त्या अ-