पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (५९) इंग्लिश लोकांच्या नेहेमीच्या ठरीव सांप्रदायाप्रमाणें दरबारांतील लोकांची निंदा केली असून त्यांस गिधाडाचें विशेषण दिले आहे. व मोठे सयाजीराव महाराज यांच्या कारकीर्दीत दिवाणास आपण जामिनकी दिली होती त्यामुळे आपणांस जो त्वास झाला त्यापेक्षांही मल्हारराव महाराज यांजपासून जास्त होईल असे लिहिले आहे. दादाभाई नवरोजी यांची त्यांनी बरीच प्रशंसा केली आहे. परंतु जुने कामदार त्यांचें कांहींच चालू देत नाहीत यामुळे त्यांस असें वाटू लागले आहे की आपला अधिकार सुरक्षित ठेवितां येणार नाहीं असें लिहिले आहे. या त्यांच्या पोकळ वाक्तांडवाचे आपल्यांस कांहीं प्रयोजन नाहीं- बडोद्याची राज्यव्यवस्था निटोप्यास आणण्याविषयीं त्यांनी जे उपाय सुचविले आहेत ते येथें दाखविले असतां पुरे आहे. ते उपाय हे:- राज्यांत सुधारणा होईल तोपर्यंत मल्हारराव महाराज यांचे हातांत राजसत्ता देऊं नये. हल्लीचे दरबारचे कामदार सर्व बरतर्फ करावेत. सर राजा दिनकरराव राजम- तिनिधी होण्यास कबूल होतील तर त्यास प्रतिनिधी नेमून त्यांस असें अभिवचन द्यावें कीं, तुह्मास योग्य रीतीनें साह्य करण्यांत येईल. जर ते कबूल करणार नाहींत तर राजप्रतिनिधीची एक सभा स्थापन करावी. त्यांत सहा खात्यांचे मुख्य अधिकारी यांस सभासद नेमून एका यूरोपियन अधि- कान्यास अध्यक्ष नेमावें आणि त्यांच्या हाताने राज्यकारभार चालवावा. याप्रमाणें गिब्स साहेब यांनी आपला अभिप्राय दिला. दादाभाई नवरोजी यांनी महाराजांस सल्ला दिल्यावरून, त्यांनीं गवरनर जनरल यांस तारीख ३१ डिसेंबर सन १८७३ च्या खलित्यांत अशी विनंति केली होती कीं. कमिशनच्या रिपोर्टवरून आपल्यास मित्रभावाने मला जो कांहीं उपदेश करावया. चा असेल, त्यापूर्वी कमिशनच्या रिपोर्टाची नक्कल माझ्या अवलोकनाकरितां पाठ- विण्यांत यावी. त्याप्रमाणें गवरनर जनरल यांनीं तारीख ३१ मार्च सन १८७१च्या खलित्याबरोबर कमिशनच्या रिपोर्टाची नक्कल महाराजांकडेस पाठविली. 9 त्या वेळेस महाराजांचा मुक्काम नवसरीस होता. आणि दादाभाई नवरोजी ब- डोद्यास राज्यकारभार पहात होते. त्यांस आणि जुन्या कामदार मंडळींस त्याबद्दल.. चा विचार करण्यासाठीं तार करून ताबडतोब नवसरीस बोलाविलें. कमिशनचे अधिकारी आपल्या रिपोर्टात काय लिहितील याविषयीं दरबारच्या कामदारांस कांहीं अज्ञान नव्हतें. कमिशनापुढें जें काम चाललें होतें त्याजवरून आ. णि महाराजांच्या व यांच्या दिवाणाच्या आचरणावरून, कमिशनचा अभिप्राय काय पडेल याचें अनुमान पूर्वीच झाले होते. आतां कमिशनच्या रिपोर्टवर उत्तर काय द्यावें याविषयीं दरबारांत विचार सु- रू झाला. जुन्या कामदार लोकांच्या विचारास असें आलें कीं, कमिशनापुढें ज्या