पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. (१२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. इतका तो निंबाजीराव ढवळे हा मुळचा फार सालस, निरभिमानी आणि निरुपद्रवी मनुष्य होता. इतर दुरभिमानी मराठ्यांप्रमाणे आपण राज्यकारभार चालविण्यास योग्य आहोंत असा त्याणे कधींही डौल घातला नाहीं. तो चौघांत स्पष्ट बोलत असे कीं, मी दिवाणगिरीचे काम करण्यास कोणतेही गुणाने योग्य नाहीं; पण काय करावें, महाराज सांगतात त्याप्रमाणे चालणे भाग आहे. आम्ही मराठे निरक्षर, आम्हास कागद देखील चाचतां येत नाहीं, त्या आम्हीं दिवाणगिरी ती कशी करावी. मोकळ्या मनाचा मनुष्य होता. मल्हारराव महाराज यांची कारकीर्द सुरू झाल्यावर हरीबा गायकवाड जेव्हां पुढे सरूं लागले तेव्हां त्यानें आपण होऊन मागे पाय काढला. कर्नल बार साहेब यांची त्याजवर मेहेरबानी, त्याचा स्वताचा सालसपणा, आणि खंडेराव महाराज निवर्तल्यावर बडोद्याच्या गादीवरील मल्हारराव महाराजांच्या हक्काविषयीं बार साहेब यांजजवळ त्याणें दोन शब्द काढले ते त्याच्या सुरक्षितपणास कारण झाले. मल्हारराव महाराज याणीं त्याची खाजगी नेमणूक त्याजकडे जशीची तशीच चालविली होती. हरीबा गायकवाड खंडेराव यांच्या कृपेतील असतां मल्हारराव यांच्या तडाक्यांतून कसे बचावले याविषयीं मागे सांगितलेच आहे. नारायणराव केळकर हा देखील अगदी सालस मनुष्य होता. महाराज यानी तो जिवंत होता तोपर्यंत त्याजकडे खाजगीची दिवाणगिरी देखील कायम ठेविली होती. गणपतराव अनंत महाजन याच्या सुरक्षितपणाचें कारण निराळेंच होते. खंडेराव महाराज यांची चौथी उपस्त्री, राधाबाई, तिचे महाजन हे कारभारी होते. पुढे ती मल्हारराव महाराज यांस वश होऊन त्यांच्या पूर्ण मेहेरबानीस पात्र झाली. हें द्वार महाजन ! यांच्या संरक्षणास उत्तम साधन झाले, व तिचा सर्व कारभार मल्हारराव महाराज यांचे अमलांत देखील त्याजकडेसच होता.