पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. विंदराव गायकवाड यांचा जेष्ठ पुत्र भानंदराव गायकवाड हे दोघेही क्षीण बुद्धीचे असून राज्यकारभार पाहण्यास अशक्त होते. यास्तव खालीं लिहिलेल्या गोष्टी विचारांत घेतल्या असतां अनुपयुक्त होणार नाहींत. मल्हारराव महाराज यांची शरीरप्रकृति चांगली नाहीं. भाऊ दाजी डाक्टर यांजकडून मला असें कळलें आहे कीं, महाराजांच्या श- रीराचा बांधा अगदी ढासळून गेला आहे, आणि मानवी प्राण्याच्या स्थितीशीं ताडून पाहिलें असतां ते दीर्घायुषी होतील असें वाटत नाहीं. दुसरें महाराजांस वारस नाहीं. लक्ष्मी बाईस कदाचित् पुत्र झाला तर सांप्रदा- याप्रमाणें तो गादीचा मालक होणार नाहीं. दत्तक घेण्यासाठी निवडून काढितां येईल असा महाराजांचा अति निकटचा संबंधी हल्लीं काय ती त्यांची कन्या कमा- बाई यांचा मुलगा आहे. तो तीनपासून चार वर्षांच्या वयाचा आहे. आणि झ- णून ह्या राज्यांत अप्राप्त व्यवहारदशा फार काळपर्यंत चालेल हे कांहीं असंभाव्य नाहीं. गायकवाड सरकारचे राज्य आपल्या मुलुखानें वेष्टित आहे यासाठीं तेथील रा- ज्यव्यवस्था चांगली असावी असा आग्रह धरणें अवश्य आहे. देशी राज्यांमध्ये आपल्या राजरीती सुरू केल्या, कोर्टे स्थापन केलीं, आपली जमाबंदीची रीत लागू केली, ज्यांचा कधीं ही अंत यावयाचा नाहीं असे कायदे स- रू केले, आणि दुसरे तशाच प्रकारचे फेरफार केले तरच सुधारणूक होऊं शकेल असें झणणारांपैकी मी नाहीं. राज्यव्यवस्थेचे नियम ठरवून देणें हें देखील मला अनुमत नाहीं. कारण, जेव्हां संधी साधेल तेव्हां ते एका बाजूस ठेवण्याचें व ते अमलांत आणण्याविषयीं टाळाटाळी करण्याचे एक साधन मात्र होईल. प्रामाणिक- पणाने आणि शुद्ध बुद्धीनें अमलांत आणिले असतां जे नियम बडोद्याच्या राज्यांत चालू आहेत ते लोकांस विशेष सुखप्रद होतील. आपण ईश्वरी तंत्रानें हिंदुस्थानांत सर्वांहून मोठे राजे आहोत. "स्वातंत्र्य' या शब्दाच्या खऱ्या अर्थाप्रमाणे या हिंदुस्थानांत कोणीही स्वतंत्र राजा नाहीं व त्यांपैकी कोणास - ही तह किंवा लढाई करण्याचा अधिकार नाहीं. मग त्याचे राज्य कितीही मोठे असो, आपण सर्वदां असा विचार केला आहे की वाईट राज्यव्यवस्था असेल तेथें मध्यस्थी करणे हे आपले कर्तव्यकर्म आहे तर तें आपण अवश्य केलें पाहिजे. अथवा ईश्वराविषयीं व हिंदुस्थानांतील लोकांविषयीं आपली कर्तव्यता करण्यापासून आपण विमुख झाले पाहिजे.. कडक उपाय योजण्याविषयीं मी फार नाखुष आहे. हिंदुस्थानांतील राजे यांचे खरें हित इच्छिणारा माझ्यासारखा दुसरा कोणी नाहीं असें म्हणण्यास मला कां- ह्रीं शंका वाटत नाहीं. याप्रमाणे त्यांच्या मिनिटांतील तात्पर्य आहे. मिनिटांतील कांहीं कलमांत