पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (५७) आपण ठेविली नसून आपण यांस बंड करूं देत नाहीं, यासाठी गायकवाडाच्या राज्यव्यवस्थमध्ये मध्यस्थगिरी आपण केली पाहिजे असे सांचे ही ह्मणणे आहे. कमिशन यांनी विजापूरच्या ठाकुरांच्या मुकदम्यांमध्ये सुरतेच्या देसायाच्या गांवांवर इंग्रज सरकाराने जप्ती केली तें प्रमाण दाखवून त्याप्रमाणे विजापूरच्या ठाकुरावर गाय- कवाडाकडून जुलुम झाला नाहीं असें लिहिलें आहे, तें राजर्स साहेब यांस रुच नाहीं. यावरून ते विषु कमिशनर असताना त्यांचा या कामाशी कांहीं संबंध होता असे वाटतें. त्यांनी त्याबद्दल असे उत्तर दिलें आहे कीं, देसाई यांनी संगनमत करून लबाडीनें तीं गांवें कांहीं रकम सरकारांत दरसाल देऊन आपली इनामी ठर विलीं होतीं. परंतु तसा त्यांचा हक्क नव्हता; सबब रेविन्य अधिकाऱ्यांनी कायद्या- प्रमाणे त्या गांवांवर जमाबंदी ठरविली आहे. देसाई यांनी कोर्टात त्याबद्दल दावा केला आहे, तेथें त्याचा योग्य निर्णय होईल. आम्हीं टकर साहेब यांच्या मिनिटावर जें कांहीं लिहिलें आहे त्याजमध्यें राजर्स साहेब यांच्या मिनिटांतील मुद्याचा निकाल झालेला आहे; सबब त्याजविषयीं आ. म्हांस लिहिण्याचे काहीं एक उरलें नाहीं. गवरनर सर फिलीप उडहाउस साहेब, आणि कम्यांडर इन चीफ साहेब यांस कमि- शन यांनी सुचविलेले उपाय पसंत झाले व त्याप्रमाणे अमलांत आणण्याविषय त्यांनी गवरनर जनरल यांस शिफारस केली. कमिशनच्या रिपोर्टवर गवरनर जनरल यांचा शेवट ठराव होण्याचे दरम्यान टकर साहेब यांची मुदत संपल्यामुळे त्यांच्या जागेवर गिब्स साहेब आले. त्यांचा अभिप्राय काय आहे ह्मणून गवरनर जनरल यांनी विचारिल्यावरून त्यांनीं तारीख २८ मे सन १८७४ रोजीं एक मिनिट लिहिलें आहे. त्यांतील कांहीं गोष्टी येथें लिहिण्यासारख्या आहेत. बडोद्याच्या पुढील राज्यव्यवस्थेच्या संबंधानें कोणाचेच अभिप्राय गिब्स साहेब यांच्या पसंतीस उतरले नाहींत. त्यांचें ह्मणणें असें आहे कीं, कमिशनाची चौक- शी संपल्यानंतर मल्हारराव महाराजांनीं पुष्कळ पैसा खर्च करून सोन्याच्या तोफा केल्या व त्याखेरीज पुष्कळ उधळेपणा केला, आणि लक्ष्मीबाई बरोबर लग्न- करून आपल्या सगळ्या सोयऱ्याशीं बेबनाव करून घेतला.ह्या बाईची पूर्वस्थिति अशी नव्हती की तिजबरोबर लग्न केल्याने स्वतः मल्हारराव महाराज यांस अथवा त्यांच्या राज्यास कांहीं प्रतिष्ठा प्राप्त व्हावी. बडोद्याच्या दरबारची ज्यांस चांगली माहिती आहे त्यांच्या ह्मणण्यांत वारंवार अ- से आले आहे कीं, मल्हारराव महाराज चौदा वर्षांचे वयाचे होते तेव्हां त्यांची वर्तणूक अशी विलक्षण असे कीं, त्यांजवर नेहमी देखरेख ठेवावी लागत असे. आणि त- शीं वेडेपणाची चिन्हें जर त्यांजमध्ये असतील तर मला त्याबद्दल कांहीं नवल वाटत नाहीं. कारण, दुसरे दमाजी गायकवाड यांचे जेष्ठ पुत्र सयाजीराव, आणि गो-