पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबाच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (५५) ताकडेस फक्त एक तासभर लक्ष दिले तर त्यास साऱ्या जन्मभर ईश्वराची प्रार्थना केल्याचे श्रय प्राप्त होते. या संबंधाने आमच्या देशांतील राजे लोकांची स्थिति खरोखर लाजिरवाणी आहे. कितीएक राजे तर दिवाणावर राज्यकारभार टाकून आपण ऐषआराम करण्यांत निमग्न झाले आहेत, आणि कितीएक राजे राज्यकारभार पाहण्यांत सगळा वेळ घालवितात परंतु त्यांचे धोरण काय तें येवढेच की प्रजपासून द्रव्य कसें हरण करावें. मिळून राष्ट्राच्या हिताविषयीं बेपरवाईच. एखाद्या कुलांतील पुरुषास कांहीं रोग जडला असतो आणि तो जसा सांस गिक दोषाने पिठ्यानपिढ्या तसाच चालतो, तशी आमच्या देशांतील राजेलो- कांची स्थिति आहे. त्यांस आपल्या पूर्वजांचें अनुकरण करावेसे वाटतेच. अनुकरण. करणें हा मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु सद्गुणाचें अनुकरण क्वचित्, आणि दुरा- चरणाचें अनुकरण फार करण्यांत येते. मल्हारराव महाराज यांनी आपल्या पूर्व- जांचें अनीतिपर आचरणाचे अनुकरण विशेष लक्षपूर्वक केल्यामुळेच त्यांच्या राज्याचा असा परिणाम झाला. आपल्या पातकांबद्दल कदाचित् इहलोकींच्या शासनापासून आपण वाचं, पण आपल्या दुष्ट चाली आपल्याच संततीस जडतील याबद्दल आमच्या देशी राजांस कांहीं भयच वाटत नाहीं. शौर्याने यश मिळविण्याचा काल गेला आहे, परंतु त्यांच्या पूर्वजांस जे यश शौ- र्याने मिळवितां आलें नाहीं तें आज इंग्रज सरकारच्या आश्रयाने शहाणपणाच्या यो गाने आमच्या देशातील राजांस मिळविण्याचा योग प्राप्त झाला असता तो ते व्यर्थ घालवितात याबद्दल फार दुःख वाटतें. आज त्यांनी राज्यकारभारामध्ये व प्रजेमध्ये गुणानें, विद्येनें, सकुलांत जन्मल्याने आणि अयोग्य आहेत त्या लोकांची सलामसलत घेऊन राज्यकारभार चालविला, प्रजे- पासून वसूल केलेल्या द्रव्याचा त्यांच्या विचारे योग्य विनियोग केला, व विद्येच्या योगानें आणि सौजन्याने ज्यांस सत्पात्रता आली आहे, त्यांसच राज्यांतील मोठ्यामोठ्या हुद्याचे अधिकार दिले तर त्यांचे, त्यांच्या वंशजांचें, आणि त्यांच्या प्रजेचे चिरकाळ ठिकणारे हित होईल, इतकेच नाहीं पण 'आमचा राज्यकारभार आमच्या अनु- मतानें करावा' असें जें ब्रिटिश सरकारच्या प्रजेचें आपल्या सरकाराजवळ मागणे आहे, व जें कधीं तरी कबूल करावें लागेल असें त्यांस वाटतें, परंतु मुद्दाम जितके लांब- णीवर नेववेल तितके नेत आहेत, त्याबद्दल देखील वाटाघाट सुरू होईल, आणि या योगाने एकंदर हिंदुस्थानांतील लोकांचे इंग्रज लोकांचा या देशाशी संबंध घडल्यामुळे जे हित होण्याचा ईश्वरी संकेत आहे तें लवकर घडून येईल आणि या भरतखंडस्थ लोकांचे परम हित घडवून आणण्यास आमच्या देशांतील राजे विशे- करून कारणीभूत झाल्यामुळे त्यांस महत यश प्राप्त होऊन इंग्लिश लोकांवर देखील त्यांची छाप पडेल, आणि या जगांतील मोठमोठ्या राष्ट्रांमधील राजनीतिविशारद पुरुष देखील त्यांची स्तुति करतील.