पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पासून जमा केलेले द्रव्य हे राजाची खासगत मिळकत नाहीं. ह्मणूनच त्यांस रा- ज्याचे विभाग करून ते आपल्या वारसांस वांटून देतां येत नाहींत; व प्रजेस अन्या - यानें वागविण्याचा, व आपले इष्क पुरे करण्याकरितां राज्यसंपत्तीचा विनियोग क- रण्याचा त्यांस अधिकार नाहीं. आमच्या देशांतील राजांच्या मनांवर वरील मूलतत्वांचा चांगला ठसा उठला • आहे असें आमच्या अनुभवास आलेले नाहीं. त्यांचीं राज्ये कायम रहावीत अशी आमची मनापासून इच्छा आहे, व तीं आह्मांस पराकाष्ठेचीं आवडतात, व त्यांच्या प्रजेचा ही व्यांजविषयीं परम अनुराग आहे. परंतु तदनुरूप राजांची वर्तणूक नाहीं यामुळे आमची व्यांजविषयीं प्रीति आणि त्यांच्या प्रजेची राजनिष्ठा किती दिवस टिकेल हैं आमच्याने सांगवत नाहीं. आमच्या देशांतील राजांच्या आंतील राज्यकारभारांत कांहीं अव्यवस्था झाली अ- सतां तुह्मांस व्याजमध्यें दरम्यानगिरी करण्याचा तहनाम्याअन्वये हक्क प्राप्त झाला नाहीं यासाठीं तुझीं मध्यस्थी करूं नये असे आम्ही ब्रिटिश सरकारास विनयपूर्वक ह्मणतो. परंतु ' आमच्या देशी राजांच्या राज्यकारभारांत अगदीच अव्यवस्था ना- हीं, तुझी आपले वर्चस्व मिरविण्यासाठी कांहीं तरी निमित्त शोधतां,' असें ई- ग्रज सरकारास आलीं ह्मणावे अशा रीतीची देशी राजांची राज्यव्यवस्था नाहीं हैं। आमचे मोठे दुर्दैव आणि आमच्या देशी राजांच्या अब्रूस मोठा कालिमा आहे. इंग्लिश लोकांचा नफा तो हिंदुस्थानवासी लोकांचा तोटा अशा कांहीं गोष्टी आहेत; आणि याच दोषामुळे त्यांचे राज्य त्यांच्या प्रजेस जितकें प्रियकर आणि सुखकर असावे तितकें नाहीं, इतकीच काय ती दुःखदायक गोष्ट आहे; नाहीं तर इंग्लिश लोकांसारखे नीतिमान् लोक या भूमंडळावर आहेत कोण !! परंतु तो वि- रोध आमच्या देशांतील राजांच्या आणि प्रजेच्या हितामध्ये मुळींच नाहीं. त्यांस आपल्या देशाचे हित करण्याचें आहे आणि त्या हितामध्ये त्यांचा वांटा आहे. 'आमच्या रयतेची अबादानी तेंच आमचें सामर्थ्य, त्यांचा संतोष तीच आमच्या राज्याची मजबुती, व त्यांची कृतज्ञता तेंच आह्मांस उत्तम फळ' हीं सन १८५८ च्या महाराणी साहेब यांच्या जाहीरनाम्यांतील वाक्यें आमच्या देशांतील राजे जर नीतीने राज्य करतील तर त्यांच्या राज्यांस जितकीं लागू पडतील तितकीं इंग्रज स- रकारच्या हिंदुस्थानांतील राज्यास लागू पडणार नाहींत. परद्वीपस्थ लोकांनीं दुसऱ्या- देशावर राज्य करून त्या देशांतील प्रजेस आणि राजेरजवाडे यांस त्यांच्या हक्कां- बद्दल अभिवचनें द्यावीं आणि आमच्या राजांनीं 'प्रजेच्या अनुरंजनेंकरून यश प्राप्त होईल तेंच आमचें अत्युत्कृष्ट धन आणि त्यांच्या हिताविषयीं आमच्या मनाची प्रवृत्ति तोच आमची ईश्वरभक्ति' अशीं प्रौढ वाक्यें जाहिरनाम्यांत लिहून आप- ल्या प्रजेचे हक्क सुरक्षितपणे चालविण्यासाठी अभिवचने का देऊ नयेत ? आमच्या देशांतील राजांच्या प्रजेचें केवढे कमनशीब ? तैमुरलंग, बादशाहा यांनीं एक वेळां असें झटले आहे की राजाने राष्ट्राच्या हि-