पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. ( ५३ ) देशांतील राजांच्या सत्तेस मर्यादा पाहिजे. आणि आपल्या प्रजेवर कोणत्या नि. यमाने ते राज्य करणार याविषयीं देखी नियम ठरविले पाहिजेत हें अगदीं अवश्य आहे असें आह्मी मनः । पूर्वक मान्य करितों. पण तसें करण्याकरितां राजाच्या प्रजेचें सामर्थ्य वाढविले पाहिजे. इंग्रज सरकारांनी आपल्या रेसिडेंटाच्या व आपल्या अनुमतानें नेमलेल्या दिवाणाच्या हातांत राज्यसत्ता दिली असतां त्यांपासून कांहीं चांगले होण्याचा संभव नसून देशी राजांच्या प्रजेची शक्ति वाढू देणें हें तर इंग्रज सरकारास इष्ट नाहीं. कारण त्यांस देशी राजाच्या द- बारांत काय तें आपलें महत्व मिरवावयाचें आहे. आज ते जर आपल्याच प्रजेस अग- दीं जरूरी पुरतें स्वातंत्र्य देत नाहींत तर ते देशी राजांच्या प्रजेस स्वातंत्र्य देण्यास का- रण होऊन त्यांचा त्यांच्या राज्यांवर दाब पडावा असें कोठून करणार ? तस्मात् ट- कर साहेब यांच्या मिनिटांत व त्याशीं जोडलेल्या मसुद्यांत उपयुक्त नियम जे कांहीं आहेत ते अमलांत येण्यास पुष्कळ कालाची अवधी आहे. समय प्राप्त झाल्या- वांचन यूरोपांतील आणि अमेरिकेतील अतिशय सुधारलेल्या राष्ट्रांचे राजकीय नि यम एका कागदावर लिहून पुढें आणिल्याने आज देशी राज्ये सुधारतात असें नाहीं. आमच्या देशांतील राज्ये यांस उद्देशून दोन शब्द लिहिले पाहिजेत. कारण, त्यांस आपण कोण, आपला अधिकार काय, तो आपणांस दिला कोणीं, व त्या संबं- धानें आपले कर्तव्यकर्म काय याचा जसा काय अगदींच विसर पडल्यासारखे दिसते. राजा हा ईश्वराचा अवतार या समजुतीचा काळ कधींच गेला. राजानें राष्ट्रांतील प्रत्येक मनुष्याशीं आपलें साम्य करून पाहिले म्हणजे त्यास सहज कळेल कीं, आपल्या आणि दुसऱ्या मनुष्याच्या अवयवरचनेंत ईश्वरानें अ- सा कांहींच भेद ठेविला नाहीं कीं, त्यावरून आपण राजा आणि इतर मनुष्यें हों आपली प्रजा असें ओळखतां येईल. इतरांप्रमाणेंच आपण मनुष्य असतां आपल्यासच राज्यपदप्राप्ति कशाने झाली व सर्वांपेक्षां आपल्याकडेस श्रेष्ठत्व कां ? व आपल्या एकाच्याच आज्ञेत येवढा मोठा जनसमूह वागतो इतकें सामर्थ्य आपल्या अंगीं आलें कशाने ? याचा राजांनीं वि- वार करावा ह्मणजे सत्ता हा एक सार्वजानिक अधिकार आहे, आणि तो लोकांनीं त्यांच्या सोईसाठीं व सुखासाठी आपण त्यांचा इमानीपणानें उपयोग करूं या बुद्धी- ने आपल्या हातांत दिला आहे, आणि तो अधिकार यथायोग्य रीतीने आपणास चालविता यावा यासाठीं ते आपल्या आज्ञा पाळितात. राष्ट्राचे सामर्थ्य आणि तेज यांचा आपल्याठायीं निक्षेप, त्या योगानें आपण प्रतापी आणि आपल्या ठिकाण प्रभविष्णुना आहे असें त्यांस सहज समजेल. वरील विचार राजांच्या मनांत आले म्हणजे त्यांनी राष्ट्रांचे संरक्षण होईल व रा- ष्ट्रांतील सर्व प्रजेचे कल्याण होईल, असें जें कांहीं कृत्य तेच केलें पाहिजे, व हैं च कायतें त्यांचे मुख्य कर्तव्यकर्म असें ठरते. राज्य ही राजांची वतनवाडी नाहीं; प्रजा ही त्यांची गुलाम नाहीं ; आणि त्यांच्या-