पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सरकारच्या अधिकाऱ्यांनीं केवळ परोपकारबुद्धीने केलेल्या सूचना जर स्वराज्यस- त्तेस अपायकारक होत आहेत तर देशी राजांच्या राज्यकारभारामध्ये ढवळाढव ळ करण्याचा त्यांस अधिकार प्राप्त झाल्यावर त्यापासून त्या राज्यसत्तेला किती अ. पाय होईल याची तर कल्पना देखील करवत नाहीं. तेव्हां ज्या नयनिपुणशिरोम- णांची इतकी सावधगिरी आहे कीं, ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूच- नेमध्ये स्वराज्यसत्तेस अपायकारक कोणत्या आणि हितकारक कोणत्या त्यांविषयीं सदसद्विचार करून मग त्या ग्राह्य करावयाच्या किंवा टाकून द्यावयाच्या, त्यांनी सर्व राज्यसुद्धां ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हातांत राहील असा मसुदा रचला असेल असें संभवतच नाहीं. त्या मसूदा रचणाराच्या आणि राजा सर टी. माधवराव साहेब यांच्या विचारांत जमीनअस्मानचे अंतर आहे. राजा सर टी माधवराव सा- हेब आमच्या देशांतील राजांचे खरे अभीष्टचिंतक आणि सानुराग मित्र आहेत असे आम्ही त्यांच्या लेखाच्या प्रमाणावरून समजतो आणि हा तद्विशेषणविशिष्ट मसुदा रचणारे गृहस्थ ते नव्हेत. सारांश, राजा सर टी माधवराव साहेब यांनीं तो मसुदा रचलेला नाहीं याविषयीं त्यांच्याच लेखाचें मजबूत प्रमाण आह्मांस सांपडल्यावरून आमचें पराकाष्ठेचे समाधान झाले असून त्या मसुदा रचणारास आली हुडकून काढूं जातां आमची जिज्ञासा पूर्ण न झाल्यामुळे जरी आह्मांस वाईट वाटलें तरी राजा सर टी. माधवराव साहेब यांचे यश निष्कलंक राहिले असा या सुदान्यांत पु. रावा सांपडला हीच आमच्या शोधाची सफलता असें आम्ही समजतो. इतक्यावर ही तो मसुदा त्यांनीच रचला असेल तर त्या वेळच्या आणि आतांच्या त्यांच्या विचा- रांत इतकें अंतर पडलें ही तरी मोठी संतोषजनक गोष्ट आहे व अनुभवाने मनुष्याच्या विचारांत नेहेमी फेरबदल होतेच. टकर साहेब यांच्या मिनिटांतील व त्याजबरोबर जोडलेल्या राज्यव्यवस्थेच्या नि- यमांतील ज्या कांही गोष्टी प्रशस्त वाटल्या नाहींत त्यांविषयीं आमच्या वि- चाराप्रमाणे आह्मी आपला अभिप्राय दिला आहे. पण त्यावरून त्या मिनिटांतील सर्व मुद्दे आम्हांस असंमत आहेत व त्या राज्यव्यवस्थेच्या नियमांतील सर्व नियम आह्मांस अग्राह्य आहेत असें समजूं नये. ' अतिशय सुधारलेल्या राष्ट्रांत ही गोष्ट एकंदरीने मान्य झाली आहे कीं, स्वे- च्छ राजा किती जरी करुण असला व ज्याजवर आपण राज्य मिळविले त्या लोकां- साठी आपले कर्तव्यकर्म कोणतें त्याविषयीं त्यांस चांगले ज्ञान असले, तरी जर त्या- च्या सत्तेला कांही मर्यादा नसेल तर तशा राजाचें राज्य देखील जितके चांगलें अ- सलें पाहिजे तितकें चांगलें कधींही असणार नाहीं.' हें टकर साहेब यांचें झणणें अगदीं रास्त आहे. तहनाम्याविषयीं आणि दिलेल्या वचनांविषयीं अनादर दाखवून नसता अधिकार ब्रिटिश सरकाराकडे आहे असें त्यांनीं प्रतिपादन केलें नसतें, आणि राजाची स्वैर सत्ता कमी करण्याचे दुसरे योग्य उपाय सुचविले असते तर त्यांचे विचार मोठ्या आनंदाने व मनोत्साहानें आह्मीं अंगिकारिले असते. आमच्या