पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (५१) करसाहेब यांनी लिहिले असून मसुदा तयार करणाराची विद्वत्ता फार मोठी आहे. असें त्या मसुद्याच्या रचनेवरूनच स्पष्ट दिसते. तर या सुदाव्यावरून तो सद्गृहस्थ कोण असावा हे आपल्यास हुडकून काढण्याचे आहे. निरनिराळ्या भागांतील दोन देशी राज्यांमध्ये कारभार करून महद्यश संपा दन केलेले असे एक सर टी माधवराव साहेब असून त्यांची विद्वत्ता ही फार मोठी आहे. त्यांनी हा मसुदा रचला असेल असें कोणी ह्मणूं शकेल, परंतु आमच्या मर्ते हा मसुदा त्यांनी रचलेला नाहीं आणि असें निश्चयपूर्वक झणण्यास आमच्या जवळ मोठे साधन आहे. बडोद्याच्या राज्यव्यवस्थेबद्दल त्यांनी सन १८७७-७८चा रिपोर्ट केला आहे, त्यां तील सव्विसाव्या कलमांत * त्यांनीं असें लिहिलें आहे कीं, देशी राजांच्या दरबा- रांतील ब्रिटिश सरकारचे अधिकारी किती ही मोठ्या मनाचे असोत,व त्यांचे उद्दे- श कितीही स्तुत्य असोत, दरबारच्या दिवाण लोकांनी स्वराज्याची सत्ता, हक्क, आ- णि अधिकार यांचें संरक्षण डोळ्यांत तेल घालून केलें पाहिजे; कारण मोठ्या सर- कारचे स्थानिक अंमलदार केवळ परोपकारबुद्धीनें ज्या सूचना करितात त्या नैस र्गिक प्रवृत्तीनें शेवट परिणामी स्वराज्याच्या हक्कास अगदीं अपायकारक होऊन बस- तात आणि येणेंकरून सार्वभौम सरकारांनी स्पष्टपणे कळविलेले त्यांचे उद्देश जाग- च्या जागी राहतात. राजासर टी माधवराव साहेब कोणत्या विचाराचे गृहस्थ आहेत आणि त्यांच्या अनुभवास काय आलेलें आहे हैं त्यांच्या वरील लेखावरून स्पष्ट दिसते. देशी रा- जांच्या दरबारांतील रेसिडेंटांनी केवळ परोपकारबुद्धीनें केलेल्या सूचना देखील स्वराज्यसत्तेस अपायकारक होतात असे ते स्पष्ट ह्मणतात. या झणण्याचें इंगित अ- से आहे की, देशी राजांच्या दरबारांतील रेसिडेंट आणि पोलिटिकल एजंट हमेष दरबारच्या राज्यकारभारांत आपले घोडे ढकलू पाहतात, आणि त्याबद्दल त्यांच्या सरकारांनीं त्यांस सक्त मनाई केली असता ही त्याची ते परवा बाळगीत नाहींत. रेसिडेंटानी केवळ परोपकारबुद्धीने केलेल्या सूचना देखील स्वराज्यसत्तेस अपाय - कारक होऊन बसतात हैं उपशब्दाने रोसडेंट याच्या कृतीचे लक्षण केलेले असून वाक्यविन्यास करण्याचें हें एक त्यांचें चातुर्य आहे. वस्तुतः त्यांच्या लेखाचें खरें इंगित वर लिहिल्याप्रमाणें आहे असें आह्मांस वाटतें. 2 त्यांच्या लेखाचा उघड अर्थ तर आह्मांस या प्रसंगी विशेष ग्राह्य आहे. ब्रिटिश

  • However high-minded and well-intentioned the British political authorities may be, the Native Minister must ever be on the watch for the due conservation of the legitimate rights and privileges of the Native State, for the inherent tendency of paramount power exercised by local agents is, however consciously to advance from beneficial supervision towards unwelcome supersession, and result contrary to the de- clared wishes and intentions of the Imperial Government." (The report on the ad- ministration of the Baroda State. Page 47.)