पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. णास अधिकारावरून काढून टाकणें किंवा ठेवणें हें तुमच्या मर्जीवर आहे. परंतु दि- वाणाची फेरबदल करण्यापूर्वी त्यास कोणती कामे करावयाचीं आहेत हें तुझीं ल. क्षांत आणिलें पाहिजे. त्याने सावकारलोकांचे हप्ते देण्याची तजवीज केली पाहिजे. आणि हे करण्याकरितां त्यानें आपल्या स्वतःच्या हिताकडेस अलक्ष करून ज्या गो ष्टी तुह्मांस आवडणार नाहींत त्यांविषयीं आग्रह धरून बसलें पाहिजे. तुमच्या इच्छेला आधीन होणारा दिवाण तुह्मांस सहज मिळेल, परंतु वर्षाच्या अखेरीस सा- वकारांचे देणें तसेंच राहील आणि मग तुमचें सर्व राज्य इंग्रज सरकारच्या सक्त देख- रेखीखालीं ठेविल्यावांचून दुसरा कांहीं उपायच नाहीं असें होईल. हें त्या सूचनेती- तात्पर्य आहे. नियम रचणाराच्या विचाराप्रमाणे दिवाणाची वारंवार फेरबदल होईल असेही क- ल्पिलें तरी त्यांत तोटा तरी कोणता? इंग्लंडच्या प्रधानक्या वारंवार बदलतात ह्मणून राज्यकारभारांत कोणती उणीव पडली आहे ? गव्हरनर जनरल व गवरनर मधेच आपली जागा सोडून जातात अगर मरतात ह्मणून कोणती अडचण आली आहे ! एकच दिवाण फार वर्षे राहिल्यापेक्षा लवकर फेरफार झाला असतां कांहीं वाईट ना. ही. त्या हुद्यावर जो कोणी नेमावयाचा तो चांगला असला म्हणजे बस आहे. आणि आज चांगल्या मनुष्याची कोठें दुर्मिळता आहे ? गोविंदराव पांडुरंग दिवाण याजविषयीं खंडेराव महाराज यांचें मन फार विटल होतें. परंतु त्यांस जो दिवाण करावयाचा होता त्यास ब्रिटिशसरकार पसंत करतील असा तो नव्हता हें मनांत समजून महाराजांनीं आपणास पाहिजे तो दिवाण नेम- ण्याची मुख्त्यारी मिळे तोंपर्यंत गोविंदरावजी यास दिवाणगिरीवर कायम ठेविलें होते. खंडेराव महाराज यांच्या अखेरच्या कारकीर्दीमध्ये राज्यांतील अव्यवस्था व मल्हार. राव महाराज यांच्या कारकीर्दीचा वाईट परिणाम सर्वांशीं बडोद्याच्या राजास पाहि- जेल तो दिवाण नेमिण्याविषयीं ब्रिटिशसरकारांनी परवानगी दिल्यामुळेच झाला अ- आमचा दृढ निश्चय आहे. यास्तव तहनाम्याने अथवा वहिवाटीनें हक्क प्राप्त झा छा असेल तर चांगला दिवाण नेमणें राजास भाग पाडण्यासाठी दिवाण पसंत कर ण्याचा अधिकार ब्रिटिशसरकारांनी आपल्याकडेस ठेवावा असें आमचें आग्रहपूर्वक ह्मणणे आहे. आणि तितके केलें ह्मणजे देशी राजांच्या राज्यकारभारामध्ये हात घाल- याची कांहीं एक जरूरी नाहीं. टकरसाहेब यांनी आपल्या मिनिटास जोडलेला राजकरण नियमांचा मसुदा कोणी तयार केला ही जिज्ञासा सहजच उत्पन्न होते. मसुदा रचणारानें निरनिराळ्या 'भागांतील दोन देशी राज्यांमध्यें कारभार करून मोठे यश मिळविलें आहे असें ठ- you prefer a minister who shall comply with all your wishes, remove every difficulty, and repel every disagreeable proposal, such a person may easily be found, but at the end of a year the bankers will be unpaid, and then neither the minister, nor your Highness, nor this Government will be able for a moment to postpone the necessity of placing your whole Government under strict control and supervision." (The Gaekwar and his relations with the British Government, by Colonel Wallace. Page 344)