पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. नाहीं. आणि सुचविलेले नियम देशी राजांनीं स्वीकारिले असतां चविलेल्या उपायांपेक्षां देखील त्यांस ते विशेष सुखकारक होतील. (४९) कमिशनांनीं सु- राज्यकारभारांत रेसिडेंट यां- यावरून त्यांच्या मनांत देशी राजांच्या ची मध्यस्थी नसावी असें दिसतें. परंतु त्यांनी ज्या नियमांवर हवाला दिला आहे त्यांत तर कायते रेसिडेंटाचें आणि त्याच्या अनुकूलतेनें दिवाणाचेंच महत्व स्थाप- न केले असून त्या नियमांस अनुसरल्यानें टकरसाहेब यांच्या मनांतील हेतु तर मुळींच शेवटास जावयाचा नव्हता. रेसिडेंटाच्या संमतीवांचून दिवाणास बरतर्फ करण्याचा अधिकार राजाच्या हा- तांत ठेविला असतां दिवाणाच्या हुद्याची वारंवार फेरबदल होईल असें त्या देशी गु- हस्थाचें ह्मणणें आहे. ही कल्पना केवळ भ्रांतिमूलक आहे. रेसिडेंटाच्या मंजुरीनें दिवाणाची नेमणूक राजाने करावी, असा नियम झाला ह्मणजे एका दिवाणास का- ढून दुसरा आणि दुसऱ्यास काढून तिसरा दिवाण नेमण्याविषयीं राजास योग्य री- तीचा प्रतिबंध होणार आहे. कारण रेसिडेंट यास पसंत पडेल असा सर्वांशीं गुण- संपन्न दिवाण निवडून काढण्याची राजास जरूर पडेल; आणि तसा दिवाण त्याने एकवेळ निवडला ह्मणजे तशा योग्यतेचा दुसरा मनुष्य त्यास मिळाल्यावांचून त्या- च्यानें त्या दिवाणास कधीही बरतर्फ करवणार नाहीं. आणि आपल्या दिवाणगिरी- अस्तित्व राजाच्या मर्जीवर आहे ही गोष्ट मनांत धरून तो दिवाण राजाच्या आ- ज्ञा पाळीळ, त्याचें महत्व ठेवील, आणि त्यास योग्य सल्ला देऊन त्याजकडून अन्या- य होऊ देणार नाहीं. राजालाही असें वाटेल कीं चांगला मनुष्य आपल्या यथेच्छ आचरणाला कधीही अनुकूळ होणार नाहीं. आणि जो मनुष्य अनुकूळ होण्यासारखा असेल तो रेसिढें- टास पसंत पडणार नाहीं. याप्रमाणे एक वेळां नेमलेल्या दिवाणापासून विलक्षण प्र- कारची चूक झाल्यावांचून व त्याने राजाची अमर्यादा केल्यावांचून त्यास काढून टाकण्याविषयीं राजाच्या मनांत कधीही येणार नाहीं. दिवाणाच्या कायमीसाठीं रेसि- डेटाची मंजुरी आणि त्यास नेमण्याचा व बरतर्फ करण्याचा राजास स्वतंत्र अधिकार या दोन गोष्टींच्या योगाने समतोलपणा राहून राज्यकारभार फार सुयंत्र चालेल, आणि राजा आणि रोसडेंट या उमायतांकडूनही दिवाण नेमण्यांत व पसंत करण्यांत चूक किंवा प्रमाद झाल्यावांचून राज्यकारभारामध्ये कधीही अव्यवस्था होणार नाहीं. चांगला मनुष्य राजाच्या यथेच्छाचरणाला कधीही अनुकूळ होणार नाहीं असें आम्ही वर झटले आहे. त्याप्रमाणेच सर माउंट् स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी सयाजी- राव महाराज यांस एका मसंगीं दिवाणाच्या संबंधानें सूचना केली होती. *दिवा- "It also rests with your Highness to retain or dismiss him from his office; but before you change, it is necessary to remember the task your minister has to perform. He must indispensably provide for the payment of your instalments to the bankers, and to do this he must disregard all private interests, and must often insist on measures that are even disagreeable to your Highness; such a person is difficult to find. If ४