पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खंडेराव महाराज यांच्या कृपेंतील मंडळीवर जुलूम. ( ११ ) यांचे अमलांत सरकार वाड्यापुढे मलीन जागेत मलापकर्षणादि क्रिया करविल्या होत्या, त्याप्रमाणे भाऊ शिंदे यांजकडून करवावयाचें बाकी राहिलें होतें तें एके दिवशीं महाराजानी त्यांस वाड्यासमोर आणून त्यांजकडून करविले, असे म्हणतात कीं, महाराज कधीं कधीं हरीबा गायकवाड व बळवंतराव राहुरकर यांस बरोबर घेऊन तुरुंगांत जात असत, आणि भाऊ शिंदे यांस आपले- समोर आणून त्यांची मनस्वी.हेलना करीत. भाऊ शिंदे यांची सर्व दौलत मल्हारराव महाराज याणीं लुटून आणिली, आणि त्यापैकीं पुष्कळ आपल्या मंडळीस वाटून दिली. खंडेराव महाराज यांचे मेहेरबानगीतील येशवंतराव मुंगीकर व चिमणा वाघ यांजवरही कांहीं आरोप आणून त्यांस मल्हारराव याणी कैदेत टाकिलें होतें, व त्यांची घरेदारे लुटली होती. हबिबुल्ला मुनसी याजवरही कांहीं अपराध लागू केला व त्यास बेड्या घालून उघडा बोडका राजवाड्यापुढे आणिलें, आणि सहा महिन्यांच्या ठेपेची त्यास कैद देऊन त्याची सर्व मिळकत लुटून आणिली. रावजी सांबा म्हणून एक मराठा होता. त्यास इंग्रजी लिहितां वाचतां येत असे. रोसिडेंट साहेब यांजकडून महाराजांचे नावें चिव्या येत होत्या त्या वाचण्यासाठीं खंडेराव महाराजांनी त्यास चाकरीस ठेविलें होतें. मल्हारराव महाराज बडोद्यास आल्यावर तो ' कांहीं दिवसांनी पळाला आणि इंग्रज सरकारच्या मुलखांत आश्रय करून राहिला. जवाहीरखान्यांतील एका आंगठीचा अपहार केल्याबद्दल त्याजवर आरोप आणून त्यास आमचे स्वाधीन करावे अशी गायकवाड सरकारानी इंग्रज सरकाराजवळ मागणी केली, व तहनाम्याप्रमाणें त्यानी त्यास गायकवाडांचे स्वाधीन केलें. असें ऐकण्यांत आहे की, निरपराधी आहें, आणि मला गायकवाडांचे स्वाधीन केलें असतां माझें जिवित सुरक्षित राह- णार नाहीं असें त्याणें ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांस फार काकुलतीने सांगितले; परंतु कायद्यापुढे त्यांचा इलाज नव्हता. त्याला मुंबईहून बडोद्यास पाठविल्यावर तो कांहीं दिवस रोसडेन्सींत ठेविला होता, परंतु शेवटी जेव्हां त्यास दरबारांत पाठविलें, तेव्हां लागलीच भाऊ शिंद्या प्रमाणेच त्याची फजिती करून त्यास तुरुंगांत पाठविलें, तो तेथें लवकरच वारला. मल्हारराव महाराज बडोद्यास आल्या बरोबर तो पळाला, आणि मला गायकवाडांचे स्वाधीन केलें असतां माझें जिवित सुरक्षित राहणार नाहीं असें म्हणाला. या . वरून जमनाबाई साहेब यांचे मुखत्यारपत्र घेऊन तो मुंबईस कांहीं खटपट करण्यासाठी गेला होता असे म्हणत होते तें खरें असेल असे वाटतें. V खंडेराव महाराज यांच्या कृपेंतील प्रसिद्ध मंडळीपैकीं काय ते चार असामीच मल्हार - राव यांचे तडाक्यांतून बचावले. १. निंबाजीराव ढवळे. १. हरीबा गायकवाड. १. नारायणराव केळकर. १. गणपतराव अनंत महाजन जे हल्लींच्या गायकवाडांचे खासगी दिवाण आहेत ते.