पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ( ४८ ) एक नियमांत ओतप्रोत भरलेले आहे. देशी राज्यांमध्यें अव्यवस्था झाली असत तीं राज्ये खालसांत करणें हैं खोकला झाला असतां गळा कापण्याप्रमाणे होय. असें त्या राजनीतिविशारद गृहस्थाने आरंभीच झटले आहे. पण त्यांनी रचि- लेल्या नियमांत आमच्या देशातील राजांची राज्यें लयास नेण्यास साधनीभूत हो. तील अशीं कितीं द्वारे आपण मोकळीं ठेविलीं आहेत हें त्यांस समजले नाहीं. अशा विचाराच्या मनुष्यास देशी राष्ट्राचा मित्र कबूल करतांना आह्मांस तर मोठी पंचाइत पडते. आह्मींवर योग्य रीतीने प्रतिपादन केले आहे, की देशी राज्याच्या चिरस्थायीप- णास काय तो आधार तहनाम्याचा, आणि इंग्रज सरकारांनी राजे लोकांस दिले- ल्या वचनांचा मात्र आहे. आणि त्या गोष्टींकडे तर त्या गृहस्थाचें निनाव देखील लक्ष नाहीं. त्याच्या एकंदर लेखांत तहनाम्याविषयों व वचनाविषयीं एक शब्द देखील लिहिलेला आढळत नाहीं. व आपण सुचविलेले उपाय अमलांत आणिले असतां तहनाम्यांस आणि दिलेल्या वचनांस बाध येणार आहे हे त्यांस पूर्णपणे माहीत असतां त्या गोष्टींकडे त्यांनी जसें काय समजून उमजून अलक्ष केले आहे, इतकें- च नाहीं पण त्यांनीं प्रतिज्ञापूर्वक आणखी असें झटले आहे की * देशी राज्यांची भावी स्थिति आणि भरभराटी आपण जी मूलतत्वें निवडून काढिली आहेत तीं मान्य करण्यावर अवलंबून आहे. हा केवढा हो स्तोम आणि केवढे पंडितमन्यव ! ! देशी राजांचे केवळ जीवन झटले ह्मणजे इंग्रज सरकारांनी त्यांजबरोबर केलेले तहनामें व त्यांस दिलेलीं वचनें आहेत. तीं त्यांनी समूळ लयास नेऊं द्यावीत आणि मी रचिलेल्या नियमास अनुसरावें ह्मणजे चांगले सुख होईल, असें त्या राजनीति- निपुणगृहस्थाचें ह्मणे प्राण जाऊं दिल्यानें देहास चिरकाल सुख प्राप्त होईल असें म्हणण्याप्रमाणे आहे. किती जरी शहाणा राजा असला तरी जो दिवाण त्या राजास केवळ कळसु- त्रांतील बाहुल्याप्रमाणें आपल्या सूत्राने नाचविण्यास इच्छील, तो दिवाण राजास कधीही प्रिय होणार नाहीं. राजा आणि दिवाण यांजमध्ये अधिकाराच्या संबंधानें मेष वाघासी चालावी असें ज्या नियमांचे पर्यवसान आहे ते नियम देशी राज्यांच्या भावी स्थितीस कल्याणकारक होतील असे ह्मणणे केवळ अभिमानमूलक होय. टकरसाहेब यांनी आपल्या मिनिटाच्या २८ व्या कलमांत असें सांगितले आहे कीं एकदा देशी राज्याच्या राज्य कारभाराबद्दल नियम स्थापित करण्यांत आले ह्मणजे सेडेंट यांस राज्यकारभारासंबंधीं प्रत्येक प्रकरणांत मध्यस्थी करण्याचे प्रयोजन "My strong belief is that their future existence and property will depend upon their confirming themselves to the principles embodied in the following draft." (Blue book No. 1 Page 73.)