पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. ( ४७ ) बेड लागले आहे असें अथवा तो आपल्यात मारेकऱ्यांकडून मारविण्याच्या मसलती करीत आहे असे देखील कुभांड रवील. त्यांस भान राहत नाहीं. देशी राजांच्या दरबारांत ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंटांचे वजन फार मोठे आहे. राज्यांतील टवाळखोर, अविचारी लोक राजाचा आणि रेसिडेंटाचा बेबनाव हो- ण्याची वाटच पहात असतात, व रोसेडेंटानें अमितत्वाने राजाबरोबर वागण्यास आरंभ केला, कीं लागलींच व्यास अनुकूल होतात. रेसिडेंटाच्या साहाय्यानें आपल कल्याण होईल अशी त्यांस आशा उत्पन्न होते, आणि मग ते आपण कोण, आपला धर्म काय, आपण ज्या अर्थाची इच्छा करतों तो न्यायानें आपणांस प्राय होण्याजोगा आहे अगर नाहीं, आणि शेवटीं आपलें होणार काय, याचें बडोद्याच्या सावकारांनीं रेसिडेंटाच्या व विठ्ठलराव देवाजी. च्या नादी लागून आपला किती खराबा करून घेतला हे वरील म्हणण्यास एक दृढ प्रमाण असून मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीत कर्नल फेर यांच्या आ- श्रयावर कमिशनापुढें सरदार व इतर लोकांनी ज्या खोट्या फिर्यादी केल्या तें एक दुसरें ताजें प्रमाण आहे. यास्तव राजाचा दिवाण राजाचाच पक्षपाती असला पाहिजे. दिवाण आणि रोसेडेंट यांचें सूत्र जमलें, आणि दिवाण जे काय म्हणेल त्यास रजांनी रुकार दिला नाहीं म्हणजे राजपदाची वारंवार उलटापालट होण्याचा प्रसंग येईल. राजाचे वारस अशी संधी पहातच बसतील आणि दिवाणाबरोबर कारस्थान करून त्यांस गादीवरून काढण्यासाठी कुभांडे रचतील, आणि स्थापित नियमां- प्रमाणे राजा राज्यकारभार चालवीत नाहीं, व रोसडेंट यांच्या व दिवाणा. च्या मसलतीनें वागत नाहीं, यास्तव तो राजपदास योग्य नाहीं, असा रोसडेंट याचा अभिप्राय पडेल. दुसऱ्यास पदच्युत करून तिसरा अशीं वार फेरबदल होईल. आणि एकास पदच्युत करून दुसरा आणि राजपदाचीं राज्ये अगदीं बुडेपर्यंत वारं- दिवाणाचा अधिकार मिळविण्यासाठी देशी दरबारांत अनेक खटपटी होतात- या या नियमाने नाहीशा होतील असे त्या नयनिपुण शिरोमणीचें ह्मणणे आहे. _आह्मांस त्याचें ह्मणणें वटकामर कबूल आहे. दिवाणाच्या अधिकाराच्या संबं धानें कदाचित कांहीं खटपटी कमी होतील. पण त्या ऐवजीं राजपदाच्या संबंधाने दरबारांत खटपटी वाढतील; तर राजपदाचे चिरस्थायीपणापेक्षां दिवाणपदाचे चिरस्थायीपणामध्ये राष्ट्राचे विशेष श्रेय आहे काय ? ब्रिटिश सरकारच्या राज्यघटनेच्या अमल्य तत्वांचें मथन करून ज्या गृहस्थानें हा नियम शोधून काढिला आहे त्याची योग्यता कितीही मोठी असो, व त्यानें दो- न देशी राज्यांमध्ये राज्यकारभार चालवून कितीही यश संपादन केलेले असो, आह्मांस तर दिवाणाच्या संबंधानें त्याच्या विचारामध्ये कांहीं एक नाहीं. राजाची वारंवार अप्रतिष्ठा कशी करावी, आणि त्यास अधिकारापासून कसे भ्रष्ट करावें हेंच कायतें मूलतत्व या नियमांत व त्याखेरीज दुसऱ्या किती राजहित दिसत