पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. गायकवाडाकडून विठ्ठलराव यांच्या कुटुंबास आपण कोणत्या न्यायाने नेमणूक देव- चावी ते मला कळत नाहीं.* हें प्रकरण बोर्ड ऑफ डायरेक्टर यांजकडे गेलें तेव्हां त्यांनीं सर जान मालकम यांचे वर्तन सर्व प्रकारें अधिकाराबाहेरचें आणि अतिशय अविचाराचें होतें असें ठरवून आपल्या ताब्यांतील अधिकाऱ्याचे वचन कायम ठेवण्यासाठी विठ्ठलराव देवाजी यांच्या दत्तपुत्रास कंपनी सरकारच्या खजिन्यांतून सालिना २४ हजार रुपयांची नेमणूक करून दिली. परंतु गायकवाड सरकारावर त्यांनी अन्यायाचा बलात्कार केला नाहीं. ह्या स्यांच्या न्यायीपणाची व इमानीपणाची कोण प्रशंसा करणार नाहीं ? ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंटानें देशी राजाच्या दिवाणाचा कैवार घेतल्यामु- ळें किती वाईट परिणामावर गोष्ट येते, तें व्यक्त करण्याकरितां फारच विस्तारपूर्वक लिहावे लागलें खरें. आणि तेर्णेकरून बरेंच विषयांतर झालें असें ही वाटण्या- सारखें आहे. परंतु तसे केल्यावांचून त्या देशी गृहस्थाच्या नियमांतील दोष व्यक्त होणार नाहींत असें वाटल्यावरून विस्तारपूर्वक कथन करणें भाग झाले आहे. ज्या नियमाबद्दल आपण चर्चा करीत आहों तो नियम ब्रिटिश सरकारच्या रा- ज्यघटनेच्या अत्यंत अमोल्य तत्वांतून निवडून काढिला आहे असें त्या तारतम्यज्ञ व अनुभवी गृहस्थाने नटले आहे; तर त्यांच्या ह्मणण्याप्रमाणें तें एक अमोल्य तत्व असेल, पण त्याचा येथें उपयोग काय ? देशी राजांच्या राज्यकारभारामध्ये तें प्रचा- रांत आणून पाहिल्यावर त्यापासून चांगले परिणाम निष्पन्न झाले आहेत, असें एक हो उदाहरण दाखविलें असतें तर आपण त्या नियमाचें कांही तरी महत्व मानले अ- सतें. पण तसें कांहीं प्रमाण दाखविण्यांत आलें नाहीं आणि अनुभवावरून असे सिद्ध झाले आहे कीं हा नियम देशी राजाच्या राज्यकारभारांत प्रचारांत आणिला असतां विठ्ठलराव देवाजीच्या योगाने बडोद्याच्या दरबारांत जसे वाईट परिणाम झाले तसेच सर्व राज्यांत होतील. दिवाणास दूर करणें हें राजाच्या हातांत ठेविलें नाहीं ह्मणजे त्यास राजाचें महत्व ठेवण्याचें कारण राहणार नाहीं. रेसिडेंट साहेबाचें साधन ठेवलें झणजे आपला अधिकार कधीं हो डळमळणार नाहीं असें वाटून तो रोसेडेंट यांच्याच धो- रणाने वागेल. राजाने त्याची एखादी मसलत ऐकिली नाहीं कीं तो राजाचा म त्सर करण्यास उद्युक्त होइल. राजास आपली मसलत न ऐकण्याविषयी कोणी तरी सल्ला देत असतो अशी त्यास शंका उप्तन्न होऊन, तो राजाच्या भोवतालच्या मंडळी- स बदसलागार ठरवून त्यांजवर अनेक संकटे आणील आणि सरतेशेवटी राजाला "I do not think the services and good conduct of the late Vittulrao bear at all upon the question of our right of forcing the Gaek war to give him and his family such an enormous income. Being the stronger power, we can undoubtedly oblige the Gaekwar to obey our orders, but unless might can be called right, I cannot under- stand how we can with justice force him to pay the Nemnuke to this family." (The Gaekwar and his relations with the British Government, by Colonel Wallace. Page 687-88.