पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (४५) विठ्ठलराव देवाजी यांच्या नेमणुकीच्या संबंधाने व त्याने दत्तक घेतला होता या सं- बंधाने सर जान मालकम यांनी त्यांचा विलक्षण रीतीने पक्षपात केला होता. ते सन १८३० मध्ये बडोद्यास आले आणि महाराजांचे मुलाकतीत इराव देवाजीविषयीं महाराजांचे मन पराकाष्ठेचें विटलें आहे, व त्यांच्या चाक. बिद्दल महाराज कोणताही हक्क आपलेवर आहे असें समजत नाहींत असे त्यांस कळून आले, तेव्हां त्यांनी महाराजांच्या अनुमतीवांचून स्वतःच बडोद्याचे राजे बनून त्यास जातनेमणूक आणि पागा वगैरे इतमाम मिळन सुमारें एक लक्ष रुपयांच्या नेमणुकीची आपल्या सहीची सनद करून दिली व ती नेमणूक वंशपरंपरा गायकवाडांनी चालवावी अशी इंग्रज सरकारच्या नावें जामिनकी पतकर- ली, आणि सयाजीराव यांची अनुमती नसता त्याने आपला पुतण्या दत्तक घेतला व त्यास त्याचा वारस कबूल केला. सन १८२८ मध्ये इंडिया सरकारांनी असें फरमाविलें होतें, को जामिनगिरीचे क रार अमलांत आणण्यास जसे कठीण आहेत तसेच ते आक्षेप घेण्यासारखे आहेत, आणि आपला गायकवाडाबरोबर प्रथम संबंध घडला तेव्हां राजकीय संबं- धाने ते जरी उपयुक्त होते तरी मुंबई सरकारांनी आतां असा निश्चय केला आहे कीं त्यांतून कसेही करून आपली सुटका करून घ्यावी आणि यापुढे अशी जामिनकी कधींही करूं नये. हें ऐकून इंडिया सरकारास फार संतोष झाला आहे. * याप्रमाणें जामिनकींतून मोकळे होण्याविषयीं व त्यापुढे नवी जामिनकी न कर ण्याविषयीं सन १८२८ मध्ये मुंबई सरकारांनी निश्चय केला असतां व त्यास हिंदु- स्थान सरकारचें अनुमत पडले असतां सर जान मालकम यांनी सन १८३० मध्यें विठ्ठलराव देवाजी यांच्या घराण्याची वंशपरंपराची जामिनकी पतकरली आणि ती हो सयाजीराव महाराज यांच्या अनुमतावांचून. नामदार लॉर्ड क्लेयर साहेब बहादूर यांजपुढे जेव्हां हें प्रकरण आलें तेव्हां त्यां- स सर जान मालकम यांच्या यथेष्टाचाराचें व धारिष्टाचें मोठें नवल वाटले. त्यांनी आपल्या मिनिटांत त्यांच्या वर्तनावर फार सक्त टीका केली आहे. लार्ड साहेब ह्मणतात:- विठ्ठलराव देवाजीच्या चाकरीबद्दल त्यांस व त्यांच्या कुटुंबास येवढी मोठी नेमणूक जबरदस्तीनें गायकवाडाकडून देवविण्याचा आपल्यास हक्क काय ? आपण बलाढ्य आहोत ह्मणून गायकवाडास आपला हकूम मानणे आपण भाग पाडूं शकूं, परंतु बळ हाच न्याय असे जोपर्यंत ह्मणतां येणार नाहीं तोंपर्यंत

  • “ As early in 1628, the Government of India had come to the opinion that "Bhandaree engagements were no less objectionable in principle than embarrassing in practice, and that although the formation of them in the early stage of our connection with the Gaekwar State was doubtless recommended by urgent and adequate motives of political expediency, they were glad to learn that the Government of Bombay had laid it down as an established principle to clear itself as soon as possible of the guarantees to existing loans, and to contract no more pledges of such a nature in future." (The Gaekwar and his relations with the British Government by Colonel Wallace. Page 699.)