पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पण कर्जाची फेड करण्याचा सयाजीराव महाराज यांनी निश्चय केला होता यास रोसेडेंट यांनी हरकत घातली. कर्जाची फेड सात वर्षांच्या मुदतीने करावयाचा ठराव झाला आहे, सबब सावकार लोकांची एकदम फेड करून घेण्याची मर्जी नसेल तर त्याबद्दल सावकार लोकांवर सक्ती करितां येणार नाहीं असें निमित्त सांगितले. याप्रमा- महाराजांचा मुख्य दिवाण विठ्ठलराव देवाजी अशा प्रकारच्या खोट्या मसलती रेसिडेंट यांस देऊन व सावकार लोकांस चिथवून आपल्या धन्यास त्रास देत होता. यावेळेस सयाजीराव यांचे देव त्यांजवर फिरलें होतें. सर जान मास्कमासार- ख्या अनुभवी गवरनरावर रेसिडेंट यांनी आपला पगडा बसवून सात वर्षांच्या मुदती- पूर्वी सावकार लोकांच्या मर्जीवांचून कर्जाची फेड करण्याचा महाराजांस अधिकार नाहीं असें ठरवून घेतलें. व दिवाण यास दूर करण्यास हरकत केली, आणि सया- जीराव यांनी ती गोष्ट मान्य केली नाहीं सचव त्यांचे कितीएक परगणे जप्त करून त्यांच्या वहिवाटीचा सर्व कुलाख्त्यार विठ्ठलराव देवाजीस सोपवून रेसिडेंटानें व्यास या मुलखाचा एक राजा बनविला. या अपकृत्यापासून सयाजीराव यांस फार वाईट वाटेल असें जरी पूर्णपणे माहीत होतें, तरी विठ्ठलरावावाचून परगण्याची व्यवस्था क- रण्यास दुसरा कोणी लायक मनुष्य नाहीं असें कल्पून सयाजीराव महाराज यांचा सर्व प्रकारें पाणउतारा केला. * सावकार लोकांनी ही एकदम कर्जाची फेड करून घेण्याची आपली मर्जी नाहीं असे सांगून तेही विठ्ठलराव देवाजी याजबरोबर अम- दाबादेस निघून गेले. याप्रमाणे सयाजीराव यांजवर प्रसंग गुदरला. त्यांच्या दिवाणास रोसिडेंट साहे- बांचें आश्रयबळ असल्यामुळे इतर लोक तर काय, परंतु त्यांच्या बायका देखील त्यास कैद करून त्यांच्या मुलास (गणपतराव महाराज) गादीवर बसविण्याच्या कुटांत सामील झाल्या होत्या, असें टिपेत एक वाक्य लिहिले आहे त्यावरून कळते. आता and spies, though necessary in the progress of the British Government to supreme power in India, was pregnant with inconveniences and dangers, and had ceased to be necessary when the supremacy was established.". (The Gaekwar and his relations with the British Government, by Colonel Wallace. Page 397.) "Government was conscious that it would add to the irritation of Sayaji to put the sequestered Mahals under Vithalrao, but he was the only person competent to manage them." (The Gaekwar and his relations with the British Government, by Colonel Wallace. Page 397.) † “ On the 16th February (1831) the Political Commissioner reported an abor- tive conspiracy at Baroda to dethrone Sayajee. It was said that Syajee's relatives and even some of his wives ("fearing lest his policy towards the British Government should cause the downfall of the State") had plotted to seize his person and confine him, to visit with condign punishment Sayajee's favourites and advisers, and in case of his still refusing to adopt their policy, to proclaim his son Gunputrao in his stead. The plot was discovered and the conspirators arrested and the ringleaders were ex- ecuted." (The Gaekwar and his relations with the British Government, by Colonel Wallace. Page 400.)